Amitabh Bachchan : बिग बींनी दिल्लीतील वडिलोपार्जित बंगला विकला; 'सोपान'ला मिळाली इतकी किंमत
Amitabh Bachchan : 'सोपान' हा बंगला साऊथ दिल्लीमध्ये आहे.
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे माहानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचं नेहमी मनं जिंकतात. मुंबई बरोबरच दिल्लीमध्ये देखील अमिताभ यांची प्रोपर्टी आहे. बिग बी यांनी त्यांचा दिल्लीमधील गुलमोहर पार्क येथील वडिलोपार्जित बंगला नुकताच विकला आहे. या बंगल्याचं नाव सोपान असं आहे. बंगल्यामध्ये हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan)आणि तेजी बच्चन (Teji Bachchan)राहात होते. हा बंगला साऊथ दिल्लीमध्ये आहे.
रिपोर्टनुसार, अमिताभ यांनी सोपान हा बंगला 23 कोटीला विकला. जाणून घेऊयात या बंगल्याबद्दलच्या खास गोष्टी-
सोपान हा बंगला दोन मजल्यांचा आहे. या बंगल्यामध्ये हरिवंशराय बच्चन यांनी एकदा कवी संमेलनाचं आयोजन केले होते. अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यानंतर सोपानमध्ये कोणीही राहात नव्हते. नेजोन ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ अवनी बदर यांनी सोपान हा बंगला 23 कोटी रूपयांना विकत घेतला आहे.
View this post on Instagram
अमिताभ यांनी 2021 मध्ये मुंबईमध्ये ओशिवारा येथे 31 कोटी रूपयांचे डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. अमिताभ यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षरकांच्या भेटीस येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha