MTV Roadies : 18 वर्षांनंतर MTV रोडीजचा 'किंग' होस्ट रणविजय सिंघाने शो चा घेतला निरोप! त्याची जागा कोण घेणार माहितीये?
MTV Roadies : MTV रोडीजचा सीझन 19 च्या सीझनला रणविजय सिंग होस्ट करणार नाही. या नंतर शो च्या नव्या जजबाबत अनेक नावे समोर येत आहेत.
MTV Roadies 19th Season : MTV Roadies पुन्हा एकदा 19व्या सीझनसह टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. पण, यावेळी तुमचा सर्वात आवडता होस्ट रणविजय सिंघा (Rannvijay Singha) तुम्हाला दिसणार नाही. रणविजय सिंह गेल्या 18 वर्षांपासून या शोशी जोडला गेला आहे. त्यामुळे जर हे खरं ठरलं तर तो त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा मोठा धक्काच असणार आहे.
रणविजय सिंघा या रिअॅलिटी शो ला कायमचा निरोप देणार की तात्पुरता तो या शोमध्ये दिसणार नाही याबाबत अजून काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. मिडीया रिपोर्ट्सनुसार, रणविजय सिंघाने स्वत: एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, तो रोडीजच्या आगामी सीझनचा भाग राहणार नाही. तो म्हणाला, चॅनेलने त्याच्या प्रवासात त्याच्यासाठी मजबूत खांब्यासारखी उभी आहे. तो पुढे म्हणाला की तो चॅनलसोबत मनोरंजक काम करत राहीन. सध्या तरी, दोन्ही बाजूंनी रोडीजच्या या सीझनसाठी गोष्टी अजूनही निश्चित झाल्या नाहीत.
रणविजय सिंघा पुढे म्हणाले की, आमच्या तारखा जुळू शकल्या नाहीत आणि हे हृदयद्रावक आहे. याशिवाय, अभिनेत्याने चॅनलसोबतच्या मतभेदाच्या अफवाही फेटाळून लावल्या आहेत. रणविजय गेल्या 18 वर्षांपासून एम टीव्ही चॅनेलच्या रोडीज या प्रसिद्ध शो शी जोडला गेला आहे. रोडीजमध्ये रणविजयची एन्ट्री एक स्पर्धक म्हणून झाली होती. पण, त्याच्या टॅलेंटमुळे तो आधी शो चा होस्ट झाला आणि नंतर शो चा मेंटॉरही झाला.
रणविजयने शो सोडल्याची बातमी समोर येताच आता 19वा सीझन कोण होस्ट करणार याकडे मात्र, लोकांच्या नजरा लागल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, अशीही बातमी आहे की, रोडीजचा सीझन 19 बॉलिवूड अभिनेता सोनू सूद होस्ट करू शकतो. मात्र, याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Parineeti Chopra, Arjun Kapoor : 'तुझा आवाज...', अर्जुननं केलं ट्रोल, परिणीतीनं दिली रिअॅक्शन
- Arjun Kapoor : ' ती मला पाहतेय'; अर्जुनला येते आईची आठवण
- MS Dhoni Novel Atharva The Origin : धोनीची नवी इनिंग; ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha