Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर
कमल हासन (Kamal Hasan) यांच्या विक्रम (Vikram) चित्रपटाची क्रेझ वाढली आहे.
Vikram : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पुष्पा चित्रपटातील गाणी आणि डायलॉग खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटातील एवढी क्रेझ होती की, अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडू या चित्रपटातील गाण्यांवर तसेच डायलॉग्सवर व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर करत होते. आता पुष्पा चित्रपटाची क्रेझ कमी होऊन आता कमल हासन (Kamal Hasan) यांच्या विक्रम (Vikram) चित्रपटाची क्रेझ वाढली आहे.
नुकताच प्रसिद्ध क्रिकेटर वाशिंगटन सुंदरनं (Washington Sundar) एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वाशिंगटन हा विक्रम या चित्रपटामधील ‘पथाला-पथाला’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. वाशिंगटननं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'तुम्हाला माझा हा अंदाज बघायचा होता ना?' या व्हिडीओमधील वाशिंगटनच्या डान्सला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. वाशिंगटनच्या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
विक्रम हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि मल्याळम या भाषामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. 'विक्रम' हा सिनेमा 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. विक्रम या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. विक्रम सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांतच 163.07 कोटींची कमाई केली. चित्रपटामध्ये कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतुपती, शिवानी नारायण, फहाद फासिल आणि सुर्या या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. रमेश बाला यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी विक्रम या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसमध्ये 300 कोटींची कमाई केली आहे. कमल हसन यांचा 300 कोटींचा टप्पा गाठणारा हा पहिला चित्रपट आहे, असंही रमेश यांनी या ट्वीटमध्ये सांगितलं.
हेही वाचा :
- Sushant Singh Rajput Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता सुशांत सिंह राजपूत; सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा
- प्रियदर्शन जाधवचं 25 वं नाटक; ‘हसता हा सवता’ 17 जून रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
- Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा