एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Shiv Sena : लोकसभेसाठी ठाकरे गटाचा परभणीचा उमेदवार ठरला, माढ्याची उमेदवारीही जवळपास निश्चित!

Lok Sabha Election 2024 : निवडणुका कधीही होतील आणि उमेदवार कुणीही असू द्या, तुम्ही तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

मुंबई: येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Thackeray)  तयारी सुरू केली असून परभणीसाठीचा (Parbhani Lok Sabha) उमेदवारही निश्चित केल्याची माहिती आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार बंडू जाधव (Bandu jadhav) हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील अशी माहिती आहे. तर माढ्याचाही (Madha Lokb Sabha) उमेदवार जवळपास निश्चित केला असल्याची माहिती समोर येत आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. परभणीसाठी विद्यमान खासदार बंडू जाधव हेच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाला इंडिया आघाडीमध्ये जागा मिळाल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार उत्तम खंदारे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 

सोलापूर, माढा आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची आज उद्धव ठाकरेंच्यासोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे दिले आदेश देण्यात आले आहेत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी 'होऊ द्या चर्चा' कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

निवडणूका केव्हाही लागतील आणि उमेदवार कोणीही असू द्या,  तयारी करा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.  

Shirdi Loksabha Election : शिर्डीचा तिढा कायम

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला द्यायची यावरून तिढा अद्याप कायम आहे. त्याचसंबंधित शिवसेना भवनवर बैठकही झाली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

शिर्डी येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आपल्याकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच आम्हाला आमचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडायच आहे. त्यासाठी बबनराव घोलप यांच्यासह आम्हाला 'मातोश्री'वरून उद्धव ठाकरे यांची वेळ द्यावी अशी मागणी स्थानीक पदाधिकाऱ्यांनी सुनील शिंदे यांच्याकडे केली. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Haryana Election Result : हरियाणात भाजपची  हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोषSupriya Sule on Haryana : हरियाणात भाजपची आघाडी; सुळे म्हणाल्या 4 पर्यंत थांबा ABP MAJHAJammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चाABP Majha Headlines : 04 PM : 06 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
सोलापुरातील पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; पत्रकरांच्यावतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
Embed widget