UGC NET Exam : यूजीसी नेट परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, एनटीएकडून फेरपरीक्षेचं आयोजन
UGC NET Admit Card 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेचं प्रवेशपत्र जारी केलं आहे.
UGC NET Admit Card नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचं आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केलं जातं. राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपची परीक्षा एनटीएकडून जून महिन्यात घेण्यात आलेली होती. मात्र, त्यावेळी परीक्षेत गैर प्रकार झाल्यानं ती परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्याची घोषणा करण्यात आली होती. सध्या नेट परीक्षा सुरु असून 30 ऑगस्टपर्यंतच्या परीक्षेसाटी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं प्रवेशपत्र जारी केली आहेत.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र जारी केली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला असेल त्यांना प्रवेशपत्र यूजीसी नेट एनटीएच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या लॉगीन डिटेल्स नोंदवून प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊ शकता.
विद्यापीठ किंवा महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदावर रुजू व्हायचं असल्यास नेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असतं. त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीनं एनटीएकडून नेट परीक्षा घेतली जाते. 30 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या परीक्षेसाठी यूजीसी प्रवेशपत्र जारी करण्यात आली आहेत. 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र लवकरच जारी केली जाणार आहेत.
नेट परीक्षा आता सीबीटी पद्धतीनं घेतली जाते. ती त्यापूर्वी पारंपरिक पद्धतीनं आयोजित केली जात होती.
एनटीए यूजीसी नेट परीक्षेचं प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे. यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्टपासून सुरु झाली असून ती 4 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
यापूर्वी एनटीकडून नेट परीक्षा रद्द
जून महिन्यात परीक्षा एनटीेकडून नेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळं परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षा आयोजनामधील गैरप्रकारची जोरदार चर्चा सुरु होती. नीट परीक्षेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं. त्यामुळं नेट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयामुळं नेट परीक्षा रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, एनटीएनं नव्यानं नेट परीक्षा तारखा जाहीर केल्या होत्या. आता नेट परीक्षा सुरु असून 30 सप्टेंबरपर्यंतच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे.
इतर बातम्या :
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI