सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून या घटनेच्या निषेधार्ह उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्षांना बंदची हाक देता येत नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बंदच्या निर्णयावर ताशेरे ओढत राजकीय पक्षांना इशाराच दिला होता. त्यानंतर, हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष उद्या काळ्या फिती बांधून आंदोलन करणार आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या बदलापूरला जाणार असल्याची माहिती आहे. येथील पीडित कुटुंबीयांवरील अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून राज्य सरकारनेही याची गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली. गृह विभागाच्यावतीने येथील पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. आता, मुंबई महापालिकेनेही शिक्षणाधिकारी यांचं निलंबन केलं आहे.
बदलापूर (Badlapur) घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकचे (BMC) शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांचे निलंबन करण्यात आले आहे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्प अंमलबजावणी न केल्यासाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच देखील निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर गृह खातेही अॅक्शन मोडवर असून बदलापूरच्या पोलीस निरीक्षक (Police) शितोळे यांचे निलंबन करुन त्यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल
POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने शाळेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सूत्रांनी सांगितले की त्यांनी POCSO कायद्याच्या कलम 19 च्या तरतुदींचे पालन केले नाही, जे प्रत्येक अधिकाऱ्याला ज्यांना अल्पवयीन मुलांवर अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची माहिती येते त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना तक्रार करणे अनिवार्य आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले नाही आणि म्हणून शाळेच्या अधिकाऱ्यांवर पॉक्सो कायद्याच्या कलम 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो कायद्याच्या कलम 19 चे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा आहे.
शुभदा शितोळे यांची बदली
बदलापूर अत्याचार प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा रविंद्र शितोळे यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी निलंबनाची कारवाईचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, असे असताना काल (23 ऑगस्ट) रोजी शुभदा शितोळे यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शुभदा शितोळे यांच्यावर कारवाई नक्की करण्यात आलीय की नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याचे आदेशही जारी झाले आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI