एक्स्प्लोर

Maharashtra SSC 10th Class Result : 27 मे रोजी दहावीचा निकाल, पण नेमका पाहणार कुठं? जाणून घ्या सविस्तर!

येत्या 27 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागणार आहे. हा निकाल तुम्हाला https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता पाहता येणार आहे.

10 th Class SSC Result Update :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) आज जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती. दरम्यान, खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.

16 लाख विद्यार्थांनी परीक्षेसाठी केली नोंदणी

मंडळाने काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण मंडळातील निकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागले होते. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धाकधूक वाडली आहे. मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. 

नऊ मंडळांमध्ये घेण्यात आली दहावीचा परीक्षा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व नऊ विभागांचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे. 

इतर माहितीसाठी कोणते संकेतस्थळ

दुपारी एक वाजता खालील संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्याला विषयनिहाय मिळालेले गुन देण्यात येतील. या गुणांची विद्यार्थ्यांना प्रिंट आउटही घेता येईल. विशेष म्हणजे https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल

1. https://mahresult.nic.in 

2. http://sscresult.mkcl.org

3. https://sscresult.mahahsscboard.in 

4. https://results.digilocker.gov.in 

5. https://results.targetpublications.org

दरम्यान, जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक 31/5/2024 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी: दहावीचा निकाल 27 मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

बारावीचा निकाल लागला, दहावीचा निकाल काही दिवसांवर, अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट 

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
MPSC Paper Leak: नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?
नीटनंतर आता MPSC औषध निरीक्षक भरतीही वादात; पेपरफुटीचे गंभीर आरोप, पुराव्यांसह तक्रार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget