एक्स्प्लोर

Maharashtra SSC 10th Result : मोठी बातमी: दहावीचा निकाल 27 मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

Maharashtra SSC Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल कधी जाहीर करणार हे जाहीर केलं आहे.

Maharashtra SSC Result 2024 Date पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21  मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची  वाट पाहत होते. आता अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर  निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्रात सीबीएसईच्या तुलनेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. 

दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.  

हेही वाचा :

 विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत...

 दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार, डिजीलॉकरद्वारे निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget