एक्स्प्लोर

Pune Crime : धक्कादायक... पुण्यात 24 तासांत तीन महिलांवर अमानुषपणे अत्याचार

Pune Crime : पुण्यात 24 तासांत पुण्यात बलात्काराच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये 9, 13 आणि 21 वर्षीय मुलींवर नराधमांकडून अमानुषपणे बलात्कार करण्यात आलाय.

Pune Crime : मुंबईतील साकिनाका परिसरात झालेल्या बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेमुळं राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अशातच पुण्यातही एकापाठोपाठ एक महिला अत्याचारांच्या घटना समोर आल्या आहेत. 24 तासांत पुण्यात बलात्काराच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये 9, 13 आणि 21 वर्षीय मुलींवर नराधमांकडून अमानुषपणे बलात्कार करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे, या मुलींच्या जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तीनंच त्यांच्यासोबत हे दुष्कर्म केलंय. पुण्यातील सिंहगड, हडपसर आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत 21 वर्षीय तरुणीवर तिची इच्छा नसताना जबरदस्ती करत बलात्कार करण्यात आला. या तरुणीने प्रतिकार केला असता तिला झाडूनं मारहाण करण्यात आली. झालेल्या घटनेविषयी कुठे वाच्यता केल्यास तिच्या भावाला ठार मारण्याचीही धमकी तिला देण्यात आली. दरम्यान यासर्व प्रकारानंतर पीडित मुलीनं तक्रार दिली असून आरोपी राहुल जनार्दन खंडारे (वय 39) याला अटक करण्यात आली आहे. 

पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेत नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी कुणाल पटेल (वय 20) यानं पीडित मुलीसोबत ओळख करून तिच्या सोबत मैत्री केली आणि मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत जबरदस्तीनं शरीरिक सबंध ठेवले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली घटना आहे. नात्याला कलंक लावणारी घटना आहे. सख्या बापानं नात्याला काळीमा फासत आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला आहे. बापानं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. मागील सात वर्षांपासून तो पोटच्या मुलीसोबत जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवत होता. नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती पहायला मिळाली आहे. मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली. एका महिलेवर आधी टेम्पोसमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली होती. परंतु, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. 

आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला की, खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Embed widget