एक्स्प्लोर

Crime News: नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना

Crime News: नात्याने आजी पण तिच्यावरच नातवाची वाईट नजर; अत्याचार केला अन् नंतर नाकाचा, तोंडाचा चावा घेऊन तिला निर्घृणपणे संपवलं; हादरवून टाकणारी घटना

राजगड (मध्य प्रदेश) : नातेसंबंधांना काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भोजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटाखेड़ी गावात एका तरुणाने आपल्या वृद्ध आजीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Crime News)मिळालेल्या माहितीनुसार, घाटाखेड़ी गावातील एका शेताजवळील झोपडीत ही घटना घडली. बुधवारी सकाळी डायल-११२ वर एका वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.(Crime News)

घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाच्या मदतीने तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गावातील शेताजवळ काही जणांची जेवणाची पार्टी सुरू होती. त्या वेळी महिलेचा मुलगा तिला शेतातील झोपडीत एकटीलाच सोडून पार्टीला गेला होता.(Crime News)दरम्यान, पार्टीत उपस्थित असलेला रामनिवास भील हा काही वेळाने कोणालाही न सांगता तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेला शोधताना ती जवळच्या गव्हाच्या शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडलेली आढळली. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येत होते तसेच जबड्यावर गंभीर जखमा होत्या.

घटनास्थळी आरोपीचे काही कपडेही आढळून आले. गावकऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर आरोपी त्या रात्री रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याने कपडे बदलून गावातून पळ काढला होता. पोलिसांनी परिसरातून मोबाईल फोन, रक्ताने माखलेले कपडे आणि इतर पुरावे जप्त केले.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी रामनिवास रायसिंह भील याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत वृद्ध महिलेकडे तो बराच काळ वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगितले. आरोपी हा मृत महिलेचा सख्खा नातू नसून दूरच्या नात्यातील नातू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

चौकशीत समोर आली धक्कादायक बाब

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, तो बराच काळ त्या वृद्ध महिलेवर वाईट नजरेने लक्ष ठेवून होता. ३ मार्च रोजी त्याने नियोजनपूर्वक कोंबडी खरेदी केली आणि कोंबडी पार्टीचे कारण सांगून त्या वृद्धेच्या मुलाला पार्टीसाठी बोलावून घेतले. पार्टी सुरू असताना आरोपी हळूच तेथून निघून शेतातील झोपडीकडे गेला, जिथे ती वृद्ध महिला एकटी होती. त्याने तिला आवाज देऊन बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने जवळच्या गव्हाच्या शेतात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, वृद्ध महिलेनं विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने अत्यंत क्रूरपणे तिच्या नाकावर आणि तोंडावर दातांनी चावा घेत गंभीर जखमी केले. या जखमांमुळे ती गंभीर अवस्थेत गेली आणि नंतर तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget