वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच वसई पूर्व परिसरात नवजात बालिका रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Vasai Crime News : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच ( International Women's Day) वसई पूर्व परिसरात (Vasai East area) नवजात बालिका रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून (Manikpur Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 7.50 वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील वसंतनगरी सिग्नल परिसरात एका हिरव्या रंगाच्या वॉशिंग पावडरच्या पिशवीत नवजात बालिका आढळून आली. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती
माहिती मिळताच पोलीस 112 आपत्कालीन वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी जमलेली होती. स्थानिकांकडे चौकशी केली असता त्या बालिकेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी तातडीने बालिकेला ताब्यात घेऊन उपचारासाठी वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून बालिकेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने नवजात बालिकेला रस्त्यावर सोडून दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना, वृद्ध आजीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या
नातेसंबंधांना काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भोजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटाखेड़ी गावात एका तरुणाने आपल्या वृद्ध आजीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली असून त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.(Crime News)मिळालेल्या माहितीनुसार, घाटाखेड़ी गावातील एका शेताजवळील झोपडीत ही घटना घडली. बुधवारी सकाळी डायल-११२ वर एका वृद्ध महिलेला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.(Crime News)
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
महत्त्वाच्या बातम्या




















