एक्स्प्लोर

Hingoli Crime : स्वतःच्या आई-वडील आणि भावाला मारणाऱ्या आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी, हिंगोली कोर्टाचा आदेश

Hingoli Murder : चहातून विष देऊन आणि विजेचा शॉक देऊन आरोपीने स्वतःच्या आई-वडिलांना आणि भावाला ठार केलं होतं. 

Hingoli Murder : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावामध्ये तिहेरी हत्याकांड  (Hingoli Triple Murder Case) घडले होते, स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याला आज बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केले असता हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहून आणि क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड्स पाहून मुलाने त्याच्या आई -वडिलांची आणि भावाची हत्या केली होती. चहातून विष देऊन आणि विजेचा शॉक देऊन ही हत्या करण्यात आली होती. या तिहेरी हत्याकांड प्रकारांमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरून गेला होता.

काही दिवसापूर्वी डिग्रस वाणीच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातात आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाला होता. मृतांची नावे कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी होती. मात्र हा अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. मयत जोडप्याच्या दुसऱ्या मुलानेच म्हणजे महेंद्र जाधव याने आई-वडील आणि भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचला. आई वडील आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या रागातून महेंद्रनं हे संतापजनक कृत्य केलं. महेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताचा बनाव रचल्याचा पोलिसांना संशय

हिंगोली जिल्ह्यातील डीग्रसवाणी या गावलागत 11 जानेवारीला वळणालगत एक अपघात झाल्याची घटना घडली होती.  या मोटासायकल अपघातात कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि आकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती महेंद्र जाधव ने स्वतः  पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली परंतु अपघातस्थळी अपघात नसून अपघाताचा बनाव केला जात असल्याचा  संशय पोलिसांना आला. त्यावरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी  पाठवले. तर मृत दाम्पत्याचा मुलगा आणि  मयत आकाशचा भाऊ महेंद्र जाधव वारंवार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तागादा लावत होता.

तब्बल पाच वेळा पाहिला दृश्यम

पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये घडलेल्या घटनेत साम्य आढळतं नव्हते. त्यामुळे  पोलिसांना महेंद्रवर संशय आला आणि पोलिसांनी महेंद्र जाधवला चौकशी साठी ताब्यात घेतले.  आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी महेंद्र जाधवला त्याच्या आई वडील कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव हे पैसे देत नव्हते.  भाऊ आकाश जाधव सुद्धा नातेवाईकांमध्ये त्याचा अपमान करत असे त्यामुळे स्वतःच्याच आई-वडील आणि भावाला मारून टाकण्याचा कट त्याने दिवाळीपासून रचला होता. त्यासाठी महेंद्र जाधव ने दृश्यम हा चित्रपट तब्बल पाच वेळा पाहून आणि क्राइम पेट्रोलचे अनेक भाग पाहून खून करण्याचं ठरवलं.

झोपेच्या गोळ्या देत  डोक्यामध्ये रॉडने वार

ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महेंद्र जाधवने स्वतःच्या आई-वडील पैसे देत नाहीत आणि नातेवाईकामध्ये सतत बदनामी करतात.  हा राग मनात धरून 9 जानेवारी रोजी रात्री भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याला विजेचा शॉक दिला तरीही मात्र आकाश जाधव जिवंत आहे हे कळल्यानंतर त्याने त्याच्या डोक्यात रोड घालून  खून केला. त्यानंतर त्याची बॉडी रोडलगत असलेल्या नाल्यामध्ये टाकली. 10 जानेवारीला दुपारी त्याची आई कलावती जाधवला सुद्धा  झोपेच्या गोळ्या देत शेतामध्ये नेत डोक्यामध्ये रॉडने वार करत तिचा सुद्धा खून केला. परत बॉडी रोडलगत त्याच ठिकाणी नेऊन टाकली.  

त्यानंतर मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि डोक्यामध्ये रोडचा वार करत खून केला.  मृतदेह परत त्याच ठिकाणी रोडच्या लगत असलेल्या नाल्यात आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ ठेवून दिला आणि त्या ठिकाणी अपघात केल्याचा बनाव केला. आरोपी महेंद्र जाधव मागील दोन तीन महिन्यापासून घरीच होता कोणतेही काम करत नव्हता . 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 02 April 2025Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
Embed widget