Bhiwandi News: भिवंडीत जमिनीच्या वादातून गावातील दोन गटात जोरदार राडा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Crime News : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील लोणाड गावात जमिनीच्या वादातून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झालाय. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.
![Bhiwandi News: भिवंडीत जमिनीच्या वादातून गावातील दोन गटात जोरदार राडा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल crime news fight between two groups in bhiwandi over land dispute Bhiwandi News: भिवंडीत जमिनीच्या वादातून गावातील दोन गटात जोरदार राडा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/23/82e845a878c17bfa635bf728d33789dd1674477334727328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Crime News : जमिनीच्या वादातून गावकऱ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झालाय. ही घटना भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील लोणाड गावात घडली असून या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. या राड्यात दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात दोन्ही गटाने परस्पर तक्रारी दिल्या आहेत. दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
भिवंडी तालुक्यातील भुवाळे गावात राहणाऱ्या बळीराम काशिनाथ केणे आणि भिवंडी तालुक्यातील काशीवली गावात राहणाऱ्या सुदर्शन खडूं पाटील यांनी एकमेकांविरोधात तक्रार दिली आहे. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरु आहे. ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे ती जमीन एका बांधकाम विकासकाला विक्री झाल्याची माहिती आहे. त्याचा व्यवहार उद्याप पूर्ण झालेला नाही. वाद सुरू असतानाच सुदर्शन खडूं पाटील हे त्या जमिनीवर बांधकाम करत असून व्हेळे गावातील वेताळ पाटील आणि हर्षद पाटील यांच्यासह 10 ते 12 साथीदारांच्या मदतीने पोकलेन लावून संबंधित जमीनीवर काम सुरु केले असल्याची माहिती बळीराम केणे आणि त्यांच्या कुटुंबाला मिळताच केणे कुटूंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन जमिनीवर सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात वाद झाला. काही वेळातच या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. सुदर्शन पाटील आणि त्यांच्या 10 ते 12 साथीदारांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने केणे कुटूंबावर जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात दोन्ही गटातील 6 ते 7 जण जखमी झाले. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. तर या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने तालुक्यात तणावाचं वातावरण असून पडघा पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मौजे लोणाड येथे19.5 एकर जमीन आहे. ही जमीन बळीराम केणे , गोपीनाथ केणे, सुदाम केणे, पंडित केणे, खंडू केणे, शांताराम भालेकर आणि इतरांच्या मालकीची आहे. या जमिनीपैकी साडेसहा एकर जमीन 2013 मध्ये विकास अनिल सिंग यांना विकली होती. तर 13 एकर जमीन हे विकास अनिल सिंग यांना विकसित करण्यासाठी देण्यात आली होती. परंतु, यामध्ये ठरलेल्या व्यवहारापैकी विक्री केलेल्या जमिनीचे आणि विकसित करण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनीची रक्कम विकास अनिल सिंग यांनी दिले नाही. त्यामुळे विकास सिंग यांना वेळोवेळी समक्ष भेटून तसेच फोन करून त्यांना ठरलेली रक्कम देण्याबाबत विचारले जायचे. परंतु, या संदर्भात विकास सिंग हे टाळाटाळ करत असल्याने सुमारे सहा-सात वर्षांपासून या जमिनीवरील काम पूर्णपणे बंद होते. परंतु, मागील एक ते दीड वर्षांपासून जबरदस्तीने धमकावून काम सुरू केले गेले. त्यावेळी केणे कुटुंबीयांनी हे काम बंद पाडले होते.
या जमिनीवर पुन्हा काम सुरू झाल्याचे कळताच केणे कुटुंबापैकी गोपीनाथ केणे, शाम भालेकर ,सुदाम केणे ,राजेश केणे ,अविनाश केणे ,पंडित केणे, किसन केणे, जगन भालेकर, तानाजी भालेकर, नीतू भालेकर, प्रभाकर अनंता भामरे, रेखा गणेश केणे, रूता, गोपीनाथ केणे, मनीषा अनंता केणे, विद्या अभिमन्यू केणे घटनास्थळी पोहोचले. यावेळी सुदर्शन खडूं पाटील यांनी त्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी व्हेळे गावातील वेताळ पाटील आणि हर्षद पाटील यांच्यासह 10 ते 12 साथीदारांच्या मदतीने पोकलेन लावून काम सुरु केले. याची माहिती बळीराम केणे आणि त्यांच्या कुटूंबाला मिळताच केणे कुटूंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन जमिनीवर सुरु असलेले काम थबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात जोरदार वाद झाला. यातूनच दोन्ही गटात मारामारी झाली.
महत्वाच्या बातम्या
Crime: सावधान! इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरिटीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तीन आरोपींची टोळी जेरबंद
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)