एक्स्प्लोर

Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती

Nashik Crime News: “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पोलिसांसमोरच आता रोडरोमिओंचे आव्हान उभे राहिल्याचे चित्र समोर आले आहे.

Nashik Crime News: “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील पोलिसांसमोरच (Nashik Police) आता रोडरोमिओंचे आव्हान उभे राहिल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात 17 वर्षीय तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारामुळे महिला व तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित 17 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे गंगापूर रोड परिसरात मॉर्निंग रनिंगसाठी गेली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तिच्या जवळून जाताना मागून स्पर्श करत तिची छेड काढली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

Nashik Crime News: तरुणीने सोशल मिडियावर सांगितली आपबिती

घटनेनंतर तरुणीने धाडस दाखवत सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. 

Nashik Crime News: तरुण मूळचा बिहार राज्यातील

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात हा तरुण मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समोर आले असून तो सध्या नाशिकमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.  

Nashik Crime News: महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह 

या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रू आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं

Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News : शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं अन्...; जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ
Yavatmal Crime: सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश
सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Embed widget