एक्स्प्लोर

Pune Crime News: दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News: मानसी चंपालाल परिहार्या (२४) आणि युवराज निलेश परतानी (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन मार्च रोजी रात्री पावणे बारा ते चार मार्च पहाटे ५.३० पर्यंत सुरू होता.

पुणे: दारूच्या नशेत तरुणीने महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर पोलिस ठाण्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. आत्महत्या (Pune Crime News) करण्याची पोलिसांना धमकी देखील यावेळी तरूणीने दिली आहे, या तरुणीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत तरुण तरुणीने पुण्यातील पोलिस ठाण्यात गोंधळ घातला.बालेवाडी येथील एका बारमध्ये मारहाण (Pune Crime News) झाल्याचे सांगून बारमध्ये तसेच पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत गोंधळ घातला. या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे. यावरून मानसी चंपालाल परिहार्या (२४) आणि युवराज निलेश परतानी (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन मार्च रोजी रात्री पावणे बारा ते चार मार्च पहाटे ५.३० पर्यंत सुरू होता. (Pune Crime News)

पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, मानसी ही विद्यार्थिनी असून युवराज हा मूळचा हरियाणा या राज्याच्या असून पुण्यात नोकरी करतो. दोघेही मित्र असल्याने तीन मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी येथील एका रेस्टॉरंटमध्ये ते पार्टीसाठी गेले. मद्यपान केल्यानंतर दोघांना कोणीतरी मारहाण केली. यावरून त्या दोघांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला. संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक यांना मानसी ने "आम्हाला मारहाण झाली असून मला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आत्ताच पाहिजे" अशी मागणी केली. यावर हॉटेल मॅनेजर यांनी सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट मुंबईत असल्यामुळे उद्या फुटेज देतो असे सांगितले. पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्या असे सांगितले असता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. 

या घटनेनंतर पोलीस त्या दोघांना घेऊन बाणेर पोलीस ठाण्यात आले तसेच त्यांना वैद्यकीय उपचार करण्याबाबत सांगितले असता या दोघांनी पुन्हा पोलीस ठाण्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी मानसीने महिला अंमलदार यांना "तू मला विचारणारी कोण? तू माझ्याशी अशा शब्दात बोलू नको" असे बोलून गोंधळ सुरू केला. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा युनिफॉर्म ओढून त्यांच्या हाताला चावा घेतला. "मी सुसाईड करून बाणेर पोलीस स्टेशन आणि तुम्हा सर्व पोलिसांची नावे लिहील" अशी धमकी सुद्धा यावेळी तिने दिली. दुसऱ्या बाजूला, युवराज ने सुद्धा "मी कोण आहे हे तुम्हाला दाखवून देतो माझी पावर वापरून तुमची नोकरी घालवतो," अशी धमकी पोलिसांना दिली, दोघांनी "आम्ही उद्या सकाळी उपचार घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात येऊ" असे सांगितले. मात्र अजून पर्यंत ते दोघेही पोलीस ठाण्यात आलेले नाहीत. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari: अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Embed widget