stock market : गुंतवणुकदारांची नफा वसुली जोरात; निफ्टी-सेन्सेक्समध्ये घसरण, 'या' क्षेत्राला फटका
Stock market updates: गुंतवणूकदारांनी जोरात नफा वसुली केल्याने मुंबई शेअर बाजारात अखेरच्या काही तासांमध्ये बाजारात घसरण झाली. मेटल, बँकिंग क्षेत्राला याचा फटका बसला.
Stock Market Today : गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसुलीमुळे शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. बाजार बंद होण्याच्या अखेरच्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा वसुली दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 112.6 अंकानी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरण होत 60,433.45 अंकावर बंद झाला. तर, निफ्टी इंडेक्समध्ये ( NSE Nifty) 24.30 अंकानी घसरण होत 18,044.25 अंकावर बंद झाला.
बँक निफ्टीमध्ये किंचीत घसरण
बँक निफ्टीमध्ये आज किंचीत घसरण झाली असल्याचे दिसून आले. बँक निफ्टी ( Bank Nifty) इंडेक्समध्ये 33 अंकांनी घसरण होत 39404 अंकावर बंद झाला.
'या' 16 शेअरमध्ये घसरण
सेन्सेक्सच्या पहिल्या 330 शेअरपैकी 16 शेअर नकारात्मक अंकात बंद झाला. त्याशिवाय, 14 स्टॉकमध्ये खरेदी झाल्याचे दिसून आले. HDFC Bank च्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. HDFC Bank स्टॉक 1.82 टक्क्यांच्या घसरणीसह 1571 च्या अंकावर बंद झाला.
या स्टॉकमध्येही घसरण
त्याशिवाय, HDFC, Maruti, Bajaj Finance, NTPC, Kotak Bank, Titan, Power Grid, ITC, HCL Tech, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, अॅक्सिस बँक आणि एचयूएल या स्टॉकमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.
या स्टॉकला मागणी
टॉप गेनर्स स्टॉक्समध्ये आज M&M हा स्टॉक 3.92 टक्क्यांनी वधारला. त्याशिवाय, एसबीआय, एल अॅण्ड टी, ICICI Bank, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, बजाज ऑटो, इन्फोसिस, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डी, सन फार्मा आणि टीसीएस या स्टॉक्समध्ये चांगली खरेदी झाली.
मेटल, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण
ऑटो, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, आयटी, ऑइल अॅण्ड गॅस, पीएसयू आणि टेक क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसून आले. बँक निफ्टी, कन्झ्युमर ड्युरेबल, एफएमसीजी आणि मेटल क्षेत्रात जोरदार विक्री झाली. त्याचे पडसाद घसरणीमध्ये उमटले. अखेरच्या काही तासांमध्ये गुंतवणुकदारांनी नफा वसुली केल्याने शेअर बाजारात किंचित घसरण झाली.
संबंधित वृत्त: