Share Market Updates : दोन दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 427 अंकांनी वधारला
Share Market Updates : मंगळवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स वधारला.

Share Market Updates : मागील दोन दिवस झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजार आज मंगळवारी वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 427 अंकांनी वधारला. तर, निफ्टीदेखील 119 अंकांनी वधारला. शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात काहीशी दिलासादायक झाल्याने गुंतवणुकदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल आणि वायू क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रात तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मीडिया एनर्जी यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होत आहे. सेन्सेक्सच्या 30 स्टॉक्सपैकी 27 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.
बजाज फिनसर्व्हचा शेअर चांगलाच वधारला आहे. हा शेअर 1.57 टक्क्यांच्या वाढीसह 15,926 रुपयांवर व्यवहार करत आहे. पॉवरग्रीडचा शेअर 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 201 रुपयांवर व्यवहार करत आहे.
वधारणारे शेअर्स
इन्फोसिस, टाटा स्टील, एनटीपीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, टेक महिंद्रा, लार्सन, कोटक महिंद्रा एशियन पेंट्स, मारुती, बजाज फिनसर्व्ह, एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअर दरात वाढ होत असल्याचे दिसून येत होते.
घसरणारे शेअर
पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक आणि डॉ. रेड्डीजच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.
शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'
सोमवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1747 अंकांनी घसरला आणि तो 56,405.84 वर स्थिरावला. तसेच निफ्टीही 532 अंकांनी घसरून 16,842.80 वर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये तब्बल 3 टक्क्यांची तर निफ्टीमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. एप्रिल 2021 नंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LIC च्या आधी 'या' 10 कंपन्यांच्या IPO ची झाली होती चर्चा!
- SBI on ABG Shipyard issue : एबीजी शिपयार्डविरुद्ध तक्रारी दाखल करण्यास विलंब नाही, एसबीआयचं स्पष्टीकरण
- Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने गाठला उच्चांक; सात वर्षातील सर्वाधिक दर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
























