search
×

LIC च्या आधी 'या' 10 कंपन्यांच्या IPO ची झाली होती चर्चा!

LIC IPO : सध्या एलआयसी आयपीओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा आतापर्यंतचा मोठा आयपीओ ठरणार आहे. LIC आधीदेखील या कंपन्यांच्या आयपीओची मोठी चर्चा झाली होती.

FOLLOW US: 
Share:

Top 10 IPO in Indian Share Market : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 13 फेब्रुवारी रोजी सेबीकडे DRHP दाखल केला आहे. देशातील हा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ठरणार आहे. एलआयसीच्या  आयपीओ 53,500 कोटी ते रु. 93,625 कोटी असू शकतो. एलआयसीच्या आयपीओ आधी काही आयपीओची मोठी चर्चा झाली होती. या 10 कंपन्यांच्या आयपीओची मोठी चर्चा झाली होती.

One97 कम्युनिकेशन्स लि. (Paytm) : नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने 18,300 कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह शेअर बाजारात लिस्ट झाला.  शेअर बाजारात लिस्ट होताना स्टॉक 2,150 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 9 टक्के सवलतीच्या दरात 1,955 रुपयांवर लिस्ट झाला. पेटीएमचा शेअर 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत, 58,795 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह शेअर 907 रुपयांवर बंद झाला.

कोल इंडिया लिमिटेड:  नोव्हेंबर 2010 मध्ये कंपनीने 15,199 कोटी रुपयांच्या इश्यू साइजसह शेअर बाजारात सूचीबद्ध केले. हा स्टॉक 245 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत 17 टक्के प्रीमियमसह 288 रुपयांवर लिस्ट झाला. कोल इंडियाचा शेअर 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत या शेअरची किंमत 167 रुपये झाली होती. कोल इंडियाची मार्केटकॅप 1,02,640 कोटी आहे. 

रिलायन्स पॉवर लिमिटेड : या कंपनीचा शेअर 2008 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. हा स्टॉक  22 टक्क्यांच्या प्रीमियमसह  548 रुपयांवर लिस्ट झाला होता. 11 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 16 रुपये होती. मार्केटकॅप 5427 कोटी रुपये आहे. 

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: क्टोबर 2017 मध्ये 11,176 कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. शेअर 912 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत 850 रुपयांवर 7 टक्के सूट देऊन लिस्ट झाला होता. 11 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 136 रुपये होती. मार्केटकॅप 23,781 कोटी रुपये आहे. 

SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड : मार्च 2020 मध्ये रु. 10,355 कोटी इश्यू आकारासह शेअर बाजारात सूचीबद्ध झाला.  हा शेअर 755 रुपयांच्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 13 टक्के सूट देऊन रु. 658 वर सूचीबद्ध झाला होता. 11 फेब्रुवारी 2022 रोजी या शेअरची किंमत 846 रुपये होती. मार्केट कॅप 79,830 कोटी आहे.

द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड: कंपनी नोव्हेंबर 2017 मध्ये 9,600 कोटी रुपयांच्या इश्यू साइजसह शेअर बाजारात लिस्ट झाली होती. 800 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत हा शेअर 6 टक्के सूट देऊन Rs 749 वर सूचीबद्ध झाला होता. 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत शेअरची किंमत 137 रुपये होती. मार्केटकॅप 22,545 कोटी रुपयांचे आहे.

झोमॅटो लिमिटेड : कंपनी जुलै 2021 मध्ये 9,375 कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह एक्सचेंजेसवर सूचीबद्ध झाली. शेअर 76 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 51 टक्के प्रीमियमसह Rs 115 वर सूचीबद्ध झाला. कंपनीचे 69,863 कोटी रुपयांचे मार्केटकॅप असून 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत शेअरची किंमत 89 रुपये होती. 

डीएलएफ लिमिटेड: कंपनी जुलै 2007 मध्ये 9,188 कोटी रुपयांच्या इश्यू साइजसह एक्सचेंजेसवर सूचीबद्ध झाली. स्टॉक 525 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत 11 टक्के प्रीमियमसह  582 रुपयांवर लिस्ट झाला होता. या शेअरची किंमत 11 फेब्रुवारी 2022 रोजी 379 रुपये होती. मार्केटकॅप 93,752 कोटी आहे. 

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड: नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनी 8,695 कोटी रुपयांच्या इश्यू आकारासह एक्सचेंजेसवर सूचीबद्ध झाली. शेअर 290 च्या इश्यू किमतीच्या तुलनेत 7 टक्के प्रीमियमसह 311 रुपयांवर सूचीबद्ध झाला. 11 फेब्रुवारी 2022 रोजी शेअरची किंमत 595 रुपये आहे. मार्केटकॅप
 1,25,769 कोटींचे आहे. 

एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड:  ऑक्टोबर 2017 मध्ये कंपनी 8,400 कोटी रुपयांच्या इश्यू साइजसह एक्सचेंजेसवर सूचीबद्ध झाली. शेअर 700 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 5 टक्के प्रीमियमसह 733 रुपयांवर लिस्ट झाला. 11 फेब्रुवारी 2022 रोजी शेअरची किंमत 1133 रुपये होती. मार्केट कॅप 1,13,327 कोटी रुपयांचे आहे.

Published at : 15 Feb 2022 08:13 AM (IST) Tags: share market stock market lic LIC IPO IPO biggest IPO

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर