(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताची परकीय गंगाजळी घटली; जानेवारी अखेर इतकाच चलनसाठा शिल्लक
Foreign Currency Reserve : देशाच्या परकिय गंगाजळीत घट झाली आहे.
सप्टेंबरमध्ये विक्रमी स्तर
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 67.8 कोटी डॉलरने कमी होऊन 634.287 अब्ज डॉलर इतका शिल्लक राहिला. मागील वर्षी 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनसाठा 642.453 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर होता.
एफसीएमध्ये घसरण
RBI च्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 28 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा कमी होण्यामागे काही कारणेदेखील आहेत. एकूण गंगाजळीचा महत्त्वपूर्ण भाग मानल्या जाणार्या परकीय चलन मालमत्तेत (FCA) घसरण झाल्याचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात एफसीए 3.504 अब्ज डॉलरहून कमी होऊन 566.077 अब्ज डॉलर इतका झाला आहे.
सोन्याचा साठाही कमी झाला
या दरम्यान सोन्याच्या साठ्याचे मूल्य 84.4 कोटी डॉलरहून घटून 39.493 अब्ज डॉलर इतकाच राहिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधील भारताचा साठाही 42 दशलक्ष डॉलरने घसरून 5.174 अब्ज डॉलर इतका राहिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- किचन बजेट आटोक्यात राहणार? खाद्य तेलाच्या किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने उचलले पाऊल
- Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्ये घट; बिटकॉइन आणि इथेरियममध्ये उसळण
- PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; तीन आयपीओही येणार
- Facebook Shares Drop : फेसबुकच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण; टिकटॉकची मार्क झुकरबर्गला टक्कर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha