Facebook Shares Drop : फेसबुकच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण; टिकटॉकची मार्क झुकरबर्गला टक्कर
Facebook Shares Drop :फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms Inc चे शेअर 20 टक्क्यांपर्यंत घसरले. फेसबुक कंपनीनेच याची कबुली दिली आहे. मेटा कंपनीला टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या कंपन्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
Facebook Shares Drop : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकसोबत टिकटॉक आणि यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्म स्पर्धा करू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात फेसबुकच्या कमाईवर याचा परिणाम होऊ शकतो. फेसबुक कंपनीनेच याची कबुली दिली आहे. बुधवारी फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms Inc चे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले.
मेटाचं म्हणणं आहे की, वर्षातील पहिल्या तिमाहीत त्यांची कामगिरी अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. Apple ने त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमची गोपनीयता बदलली आहे. त्यामुळे ब्रँड्सना Facebook आणि Instagram वर जाहिरात करणे कठीण होत आहे. यासोबतच पुरवठा साखळीतील आव्हानांमुळे कंपनीच्या अडचणीही वाढल्या आहेत.
मेटा कंपनीला टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या कंपन्यांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. युजर्स खूप मोठ्या संख्येने या प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. त्यामुळे आगामी तिमाहीत फेसबुकच्या महसुलावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत फेसबुकचे महिन्याला 2.91 अब्ज सक्रिय वापरकर्ते होते. परंतु, मागील तिमाहीच्या तुलनेत या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.
मेटाचे प्रमुख आर्थिक अधिकारी डेव्ह वेहनर यांनी बुधवारी एका कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितले की, येत्या तिमाहीत कंपनीचा महसूल अपेक्षेपेक्षा कमी असू शकतो. यामुळे कंपनीचा शेअर्स 20 टक्क्यांनी घसरला आहे.
इनसाइडर इंटेलिजन्स विश्लेषक डेब्रा अहो विल्यमसन त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मेटा अनेक आव्हानांना तोंड देत आहे. Tiktok सारख्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या आव्हानामुळे त्याच्या जाहिरातींच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. जाहिरात महसूल कंपनीच्या कमाईचा एक मोठा भाग आहे.
दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील मार्क झुकरबर्ग यांचे स्थान खाली घसलले आहे. झुकरबर्ग यांच्या संपत्तीत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे. वॉरन बफेट यांनी संपत्तीच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे.
महत्वाच्या बातम्या