PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; तीन आयपीओही येणार
PSU Privatization : येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे पूर्ण खासगीकरण होणार आहे. त्याशिवाय तीन कंपन्यांचा आयपीओ बाजारात येणार आहे.
Privatization in PSU : केंद्र सरकारकडून मागील काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. येत्या आर्थिक वर्षात तीन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होणार आहे. त्याशिवाय तीन कंपन्यांचा आयपीओ शेअर बाजारात येणार असून सरकार आपला हिस्सा विकणार आहे. निर्गुंतवणूकसाठी केंद्र सरकारने धोरण ठरवले आहे. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येत आहे.
येत्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये केंद्र सरकारकडून शिपिंग कॉर्पोरेशन, बीईएमएल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
'दीपम'चे सचिव तुहीन कांत पांडेय यांनी सांगितले की, पुढील वर्षी सार्वजनिक उद्योगातील काही समभागांची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी आयपीओ आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ईसीजीसी, वॅपकॉस आणि नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन या कंपन्यांचे आयपीओ आणणार आहे.
बीपीसीएल, पवनहंसचे काय?
मार्चअखेर पवन हंस विक्रीचे काम पूर्ण होईल का, असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही अद्याप निविदा उघडल्या नाहीत आणि नंतर मंजुरी मिळण्यास थोडा वेळ लागेल. शिपिंग कॉर्पोरेशन आणि BEML च्या मूळ आणि नॉन-कोअर मालमत्तांचे विघटन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर त्याच्या धोरणात्मक विक्रीसाठी आर्थिक निविदा मागवल्या जातील असेही त्यांनी सांगितले.
बीपीसीएलच्या खाजगीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, बीपीसीएलसाठी बोली लावणाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर ही चर्चा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेणेकरून लीलाव प्रक्रिया पुढे नेता येईल.
केंद्र सरकार बीपीसीएलमधील 52.98 टक्के, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील 63.75 टक्के, बीईएमएलमधील 26 टक्के आणि पवन हंसमधील 51 टक्के हिस्सा विकत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: