महिला व्यावसायिकानं केली 116 कोटींच्या घराची खरेदी, घरात तब्बल 8 कार पार्किंगची व्यवस्था
मुंबईतील एका व्यावसायिक महिलेने नवीन घराची खरेदी केली आहे. यामध्ये 8 कार पार्किंगची जागा देखील खरेदी केली आहे.
Business News : जेव्हा सामान्य माणूस घर (Home) खरेदी करतो तेव्हा तो फक्त एक किंवा दोन कारसाठी पार्किंगची (Car Parking) जागा खरेदी करण्याचा विचार करतो. जेव्हा एखादी मोठी व्यावसायिक व्यक्ती घर खरेदी करते तेव्हा ही संख्या 5 ते 6 कारची पार्किंग असू शकते. परंतू मुंबईतील एका व्यावसायिक महिलेने नवीन घराची खरेदी केली आहे. यामध्ये 8 कार पार्किंगची जागा देखील खरेदी केली आहे. महिलेनं या अपार्टमेंटचा खरेदी 116 कोटी रुपयांना केली आहे. वर्तिका गुप्ता (Vartika Gupta) असं त्यांचं नाव आहे.
तुम्हीही तुमचे स्वतःचे घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किती गाड्यांसाठी पार्किंगसाठी जागा मिळवण्याचा विचार केला असेल. 1 किंवा 2, पण एक व्यावसायिक महिला अशीही आहे जिने 8 पार्किंग स्पेस असलेले घर घेतले आहे. या घराचा सौदा 116 कोटी रुपयांना झाला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
फॅशन डिझायनर आणि मेसन सियाच्या संस्थापक, वर्तिका गुप्ता यांनी मुंबईतील '360 वेस्ट' या बहुचर्चित टॉवरच्या 49 व्या मजल्यावर एक भव्य अपार्टमेंट विकत घेतले आहे. यासोबतच 8 कार पार्किंगचीही खरेदी करण्यात आली आहे. त्याची डील 116.42 कोटी रुपयांना झाली आहे.
5.82 कोटी रुपये मुद्रांक शुल्क
प्रॉपर्टी साइट indextap.com च्या बातमीनुसार, वर्तिका गुप्ता यांनी या घराच्या खरेदीवर केवळ 5.82 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. ही इमारत लोअर परळमध्ये आहे. वर्तिकाच्या घराचा आकार 12138 स्क्वेअर फूट आहे. वर्तिका मेसन सियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. वर्तिका स्वतः फॅशन डिझायनर आहे, तर तिची कंपनी होम डेकोर विभागात काम करते.
दमाणी यांचाही संबंध
वर्तिकाने ज्या इमारतीत घर घेतले आहे ती इमारत ‘360 वेस्ट’ आहे. ती ओबेरॉय ग्रुपशी संबंधित आहे. 2023 मध्ये ही इमारत चर्चेत होती कारण 'डी-मार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांच्या सहयोगी आणि कुटुंबीयांनी येथे घर खरेदी करण्यासाठी 1238 कोटी रुपयांचा मोठा सौदा केला होता. ओबेरॉय ग्रुपची ही इमारत अनेक अर्थांनी खास आहे. यात सर्व लक्झरी सुविधा आहेत. या इमारतीत दोन टॉवर आहेत आणि अनेक मोठ्या व्यक्तींची घरे आहेत. एकेकाळी अभिषेक बच्चननेही या इमारतीत एक घर घेतले होते, जे नंतर 45 कोटींना विकले.
महत्त्वाच्या बातम्या: