एक्स्प्लोर

खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड

अस्सल मराठी चवीचे पदार्थ जगात पोचवायचे या हेतूने सुरुवातीला, इंस्टंट 'मिसळ रस्सा' आणि महाराष्ट्राची अजून एक लाडकी रेसिपी 'अळूची भाजी' पॅकेट्स मधून जगभरातल्या मराठी लोकापर्यंत पोचवायची इच्छा आहे.

मागे एका ब्लॉगमध्ये पुण्याच्या पहिल्या मिसळ महोत्सवाबद्दल थोडी माहिती दिली होती. आज त्याच्या मागची थोडी चीड आणणारी खरी बॅकग्राऊंडही सांगतो. आपल्याकडे होणाऱ्या जनरल फूड इव्हेंट्स म्हणजे एक अजब प्रकार असतो. लोकांना आवडतं (असं जे काही आयोजकांना वाटतं) म्हणून खाण्याचे मिळतील त्या स्टॉल्सवरचे वाट्टेल ते पदार्थ ठेवणे त्याला आपल्याकडे ‘फूड एक्स्पो’ म्हणतात; हा एक मला कधीच न समजलेला प्रकार आहे. इथे तवा पनीरच्या शेजारी इटालियन पास्ता, किंवा चिकन मंच्युरियन असतं. त्याच्यापलीकडे पुन्हा मोमोज किंवा इडली, डोशाचाही स्टॉल असू शकतो. अर्धवट आंग्लाळलेले पब्लिक पंजाबी, दाक्षिणात्य युतीपासून ते काँटिनेंटल पदार्थावर तुटून पडत असतं. आजकाल पुण्यामुंबईसारख्या शहरातही ‘डाऊनमार्केट’ समजले आपले अस्सल मराठी पदार्थांचे स्टॉल्स आपला व्यवसाय दिलेल्या कुठल्यातरी कोपऱ्यात अंग चोरुन, कोणाचे लक्ष आपल्याकडे गेलंच तर खाली मान घालून करत असतात. मला राग आणणारा प्रकार मराठीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आमच्या पुण्यातच घडला होता. 2001-2002 च्या आसपास पुण्यात सेनापती बापट रस्त्याला आयसीसी ट्रेड टॉवर व्हायच्या आधी मराठा चेंबरनी एक प्रदर्शन भरवले होते. आम्ही काही मित्रांनी आमच्या क्लबमार्फत तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल प्रॉडक्टसकरता एकत्र स्टॉल्स घेतले होते. प्रदर्शनात भरपूर इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट असले तरी प्रदर्शनात सगळ्यात जास्ती गर्दी व्हायची ती खाण्याचे स्वतंत्र दालन केले होते त्याच्याकडे. आम्ही सगळेजण दुपारी त्या दालनात आमचे घरुन आणलेले डबे घेऊन जेवायला जात असू. त्याबरोबर तिथले थोडेसे काही पदार्थ घेऊ म्हणून पदार्थाची यादी बघायचो, त्यात एकही पदार्थ मराठी नसायचा. माझ्या आठवणीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर/सब कॉन्ट्रॅक्टर कोणीतरी पंजाबी इसम होता. त्यांनी मी विचारल्यावर मला “प्रदर्शन ‘चांगल्या लोकांचे’ आहे म्हणून मराठी पदार्थ या प्रदर्शनात चालणार नाहीत, त्यामुळे आम्ही फक्त पंजाबी, इतर प्रांतातले आणि काँटिनेंटलच पदार्थ ठेवतो”असं उद्दाम उत्तर दिलं होतं. त्याला समजावून त्याच्या डोक्यात फार काही प्रकाश पडला नाही. मग मीही त्याच्याकडे अर्थातच काहीच घेतलं नाही. पण तेव्हापासून आपण एकतरी मराठी पदार्थ जगात पोचवायचा, त्याचा भाग व्हायचं अशी सुप्त इच्छा मनात कुठेतरी होती. आधीच्या कामातून मोकळं झाल्यावर लोकांना पिकनिककरता होम स्टे देताना त्यांना मेन्यू सुचवायला आणि तो लोकांकडून करून घ्यायची सवय लागली. त्यातही चांगले बनवलेले अस्सल मराठी पदार्थ आपल्याप्रमाणेच इतर लोकांनाही नक्कीच आवडतात हा मुळातला समज पक्का झाला. एकीकडे लिखाण सुरु झाल्यामुळे मनातले विचार थोडेफार फेसबुक आणि वृत्तपत्रातून मांडायला लागलो. खाण्यावर पहिलं प्रेम असल्याने त्यावरही लिहायला लागलो, लोकांनाही ते आवडत गेलं. त्यातून लिहिताना मिसळ महोत्सवाची रेंगाळलेली कल्पना प्रत्यक्षात पुढे आणता आली. या अस्सल मराठी ‘वन डिश मिल’चा महोत्सव एन्जॉय करायला पुण्यात हजारो लोकं आले. त्यानिमित्ताने अनेकांशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला. हॉटेल इंडस्ट्री मधल्याही अनेक जेष्ठ तज्ञ लोकांशी चांगला परिचय झाला. त्यामुळे जानेवारीत लोकांच्या आग्रहाने केलेला "मिसळ आणि बरंच काही" ही पुन्हा एकदा मराठी पदार्थांची स्पेशल फुड इव्हेंट्स, मास्टरशेफ्सचे थीम कुकरी शो असे कार्यक्रम यशस्वी झाले. फायद्याचं बोलायचं झालं तर, या दोन्ही महोत्सवांतून झालेला मला झालेला खरा फायदा म्हणजे, शेकडो किंबहुना हजारो लोकांना प्रत्यक्ष भेटून घेतलेल्या त्यांच्या 'फीडबॅक' मधून, लोकांना आवडणाऱ्या मिसळीची चव कशी असावी ह्याचा चांगल्यापैकी अंदाज आला. या सगळ्या अनुभवाचा फायदा घेऊन गेले काही महिने या कल्पनेवर काम केलं. अनेक ट्रायल्सनंतर लोकांना आवडणाऱ्या चवीचे पदार्थ देण्यासाठी आता 'फक्कड फुड्स 'नावाने स्वतःचा इंस्टंट फुड्सचा नवीन व्यवसाय सुरु केला. मुळात परदेशात डेव्हलप झालेली पण आता आपल्याकडे उपलब्ध असलेली पॅकेजिंगची पद्धत वापरून अनेक लोकं यात पास्ता, थाई करी वगैरे करुन विकतात. आम्ही त्यात स्वतःला योग्य वाटणाऱ्या(च) चवीचे मराठी पदार्थ बनवून ‘फक्कड’ या ‘ब्रँडनेम’ने मार्केट मध्ये आणले आहेत. अस्सल मराठी चवीचे पदार्थ जगात पोचवायचे या हेतूने सुरुवातीला, इंस्टंट 'मिसळ रस्सा' आणि महाराष्ट्राची अजून एक लाडकी रेसिपी 'अळूची भाजी' पॅकेट्स मधून जगभरातल्या मराठी लोकापर्यंत पोचवायची इच्छा आहे. खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड पॅकेटमधले कॉन्सट्रेट कढईत ओतून त्यात फक्त पाणी मिसळून एक उकळी दिली की हा रस्सा तयार होतो. त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ, फरसाण, कांदा घातले की घरच्या घरी चार जणांसाठी मिसळ तयार! हीच पद्धत पारंपारिक अळूच्या भाजीसाठीही. एका पाकिटात साधारण 4 बाऊल भाजी 'मॅगी'पेक्षाही कमी वेळात आणि त्याच्याही पेक्षा पौष्टिक आणि चविष्ट भाजी तयार होते; अगदी लहान मुलांनाही तयार करुन खाता येईल एवढी सोप्पी. मसाले, कृती स्वतःची असल्याने चव बहुसंख्य लोकांना आवडणारी असेल याची खात्री देऊ शकतो. 'इंस्टंट' असली तरी दोन्ही रेसिपीजमध्ये कटाक्षाने कुठलेही प्रिझरव्हेटीव्ज/कलर वापरत नाही. या पाकिटांना फ्रीजमधेही ठेवायला लागत नाही, तरी शेल्फ लाईफ एक वर्षापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे परदेशातही पाठवायला ही अतिशय योग्य आहेत. आजच्या नॅनो फॅमिलीच्या दोघांनीही व्यवसाय/ नोकरी कराव्या लागणाऱ्या जमान्यात, कामावरुन दमून येणाऱ्या लोकांना स्वतःच्या घरी, एखाद्याच्या घरी गेट टूगेदर करताना, अगदी ट्रेकला जाताना कुठल्याश्या अनगड किल्ल्यावर जेवतानाही लोकांना अस्सल मराठी चवीचे जेवण लोकांना करता यावे यासाठी मनापासून केलेल्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे. सध्या पुण्यातील फूड प्रॉडक्टमधे अग्रगण्य असलेल्या 'अग्रज' च्या काही आऊटलेट्समधे आणि इतरही काही नामवंत आणि सोयींस्कर ठिकाणी असलेल्या दुकानात 'फक्कड'ची प्रॉडक्ट्स मिळायला सुरुवात झाली आहे. त्याहीआधी शेल्फ लाईफचांगले असल्याने काही मित्रमैत्रिणी, 'फक्कड'ची पाकिटे परदेशात घेऊनही गेले. या सगळ्यांचाचा मिळणारा ‘फीडबॅक’ उत्साह वाढवणारा आहे. माझ्यामते एक फूड ब्लॉगर, फूड इंडस्ट्रीमध्ये वावरणारा एक व्यक्ती म्हणून लोकांच्या गरजा आपल्याला समजत असतात(खरतर समजायला हव्यात). एक मराठी माणूस म्हणून आपल्याला त्यातून आपले पदार्थ प्रामुख्याने प्रमोट करता यायला पाहिजेत. तरच आपल्या लिखाणालाही काहीसा चांगला अर्थ येतो. तसं फूड ब्लॉगर म्हणून कोणाकडून तरी पैसे घेऊन, इतरांना फक्त ‘क्रिटीसाईझ’ करत रहाणं, तुलनेने फारच सोप्पंय!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
अन्यथा नागपूरच्या अधिवेशनात घुसून आंदोलन करू; आरक्षित भूखंडावरुन मनसे आक्रमक, नेरुळमध्ये उतरले रस्त्यावर
Gold : सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये सोनं 35 -40 हजारांनी वाढणार? कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
सोनं आणखी महागणार, 2026 मध्ये 30 टक्के दर वाढणार, कोणत्या कारणानं सोन्याचे दर भडकणार? जाणून घ्या 
Yavatmal Bus Accident : चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू  चिरत गेला, दोघांचा मृत्यू, 14 जखमी
चंद्रपूर यवतमाळ एसटी बसला ट्रकची समोरुन धडक, ट्रक एसटीची एक बाजू चिरत गेला, दोघांचा मृत्यू
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
Modi-Putin : नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
नरेंद्र मोदी- पुतिन यांचा एकाच कारमधून प्रवास, दोन्ही नेते महाराष्ट्र पासिंग SUV Toyota फॉर्च्यूनरमधून रवाना 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Embed widget