Shani 2024 : 15 नोव्हेंबरला शनीची सरळ चाल; 'या' 4 राशींचा कठीण काळ होणार सुरू, कोसळणार संकटांचा डोंगर
Shani 2024 : अवघ्या काही दिवसांत शनि सरळ चाल चालणार आहे, जी 4 राशींसाठी घातक ठरू शकते. या राशींना पावलोपावली संकटांचा सामना करावा लागू शकतो.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ राशीत वक्री असलेला शनि (Shani) लवकरच मार्गी होत सरळ चाल चालणार आहे. कुंभ राशीत शनिदेव 29 जून 2024 रोजी वक्री झाले होते. त्यानंतर याचवर्षी दिवाळीनंतर शनि वक्रीतून मार्गी होणार आहे. 15 नोव्हेंबरला शनि मार्गी होईल. ऐन दिवाळीनंतर शनीची बदलणारी चाल काही राशींसाठी अडचणीची ठरणार आहे.
शनि 15 नोव्हेंबर 2024 रोजी मार्गी होणार आहे. याचाच अर्थ शनि दिवाळीनंतर लगेच मार्गी होत आहे. शनीची सरळ चाल 4 राशींसाठी अशुभ ठरू शकते. त्यामुळे या काळात या राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer)
शनिच्या सरळ चालीदरम्यान कर्क राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे, कारण दिवाळीनंतर तुमचा कठीण काळ सुरु होणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील वाद सोडविण्याचा प्रयत्न करा. तुमचे खर्च देखील वाढू शकतात. विचार करुनच नोकरी बदलण्याचा निर्णय घ्या, अनावश्यक ताण घेऊ नका. नोकरीत सहकाऱ्यांशी वाद संभवतात, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वृश्चिक रास (Scorpio)
शनीच्या अशुभ दृष्टीपासून वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावं. या काळात कुठलंच शुभ कार्य सुरू करू नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं तर हा काळ चांगला नाही, तुमचं कोणत्या न कोणत्या मार्गाने नुकसान होईल. सर्व कामांत अडचणींचा सामना करावा लागेल. या काळात कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, एखादी व्यक्ती अडचणीत अडकू शकते.
मकर रास (Capricorn)
दिवाळीनंतर मकर राशीच्या लोकांचा दिवाळीनंतर कठीण काळ सुरू होणार आहे. शनीची सरळ चाल मकर राशीसाठी शुभ ठरणार नाही. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या काळात आर्थिक व्यवहार टाळा. आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा अनुचित घटना घडू शकतात.
मीन रास (Pisces)
शनीची सरळ चाल मीन राशीच्या लोकांसाठी घातक ठरेल. या काळात तुम्ही कितीही प्रयत्न करा, परंतु तुमच्या कामांना यश मिळणार नाही. प्रत्येक कामाला उशीर होईल. या काळात तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याच प्रकारे अपशब्द काढू नका, जेणेकरुन नंतर तुम्हाला त्याचा पश्चात्ताप होईल. या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :