एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?

तिन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असून या ठिकाणी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर ठरते यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत माचनूर येथील महादेव मंदिरात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विराट सभेची सुरुवात झाली. विशेष म्हणजे कालच संध्याकाळी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते याच ठिकाणी झाला होता. काल मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव न घेता गद्दार आला जनता धडा शिकवेल असा टोला लगावल्याने आज प्रणिती शिंदे आणि भगीरथ भालके याला काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

माचनुरचा महादेव कोणाला पावणार?

मंगळवेढा तालुक्यातील अतिशय पुरातन असणाऱ्या माचनूर येथील महादेव मंदिरात सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडल्याने माचनुरचा महादेव कोणाला पावणार? याचीही चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रचाराचा शुभारंभ केला होता. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांचा येथेच शुभारंभ झाला होता. आता आज याच ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे भगीरथ भालके यांनी विराट शक्ती प्रदर्शन करीत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. 

महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर? 

तिन्ही उमेदवारांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असून या ठिकाणी महाविकास आघाडीत झालेली बिघाडी कोणाला फायदेशीर ठरते यावर येथील निकाल अवलंबून असणार आहे. महाविकास आघाडीतील लोकसभेला एकत्र असलेले माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी तर सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या भगीरथ भालके यांच्या प्रचाराला आल्याने जिल्ह्यातील दोन्ही खासदार विधानसभेला एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र तयार झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget