एक्स्प्लोर
Guru Transit 2024 : 28 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशींना सोन्याचे दिवस; गुरुचा असणार शुभ प्रभाव, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Guru Gochar 2024 : दिवाळीनंतर गुरु हा चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या काळात 3 राशींची आर्थिक स्थिती उंचावेल, नोकरी-व्यवसायातून चांगला लाभ होईल.
Guru Gochar 2024
1/10

गुरू हा नवग्रहातील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. अशात गुरुच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी गुरु ग्रह वृषभ राशीत स्थित आहे.
2/10

गुरु वेळोवेळी ग्रह आणि नक्षत्र बदलतो, अशा वेळी गुरुचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात दीर्घकाळ टिकतो.
3/10

दिवाळीनंतर गुरु नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. गुरुच्या नक्षत्रातील बदलाचा काही राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे. या राशींचं जीवन दिवाळीनंतर सुखाने बहरुन जाईल.
4/10

कारण 28 नोव्हेंबरला दुपारी 1:10 वाजता गुरु चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि 2025 पर्यंत तो या नक्षत्रात राहील. गुरुच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींनी फायदा होणार? जाणून घेऊया.
5/10

सिंह रास : सिंह राशीच्या लोकांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभासोबत खूप आनंद मिळणार आहे. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे होतील. नवीन नोकरीसाठी ऑफर येऊ शकतात. यासोबतच जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.
6/10

जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या कालावधीत तुम्ही ते करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. जर तुम्हाला परदेशात नोकरी करायची असेल तर तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यातही यश मिळू शकतं.
7/10

तूळ रास : दिवाळीनंतर तूळ राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली असू शकते, यासोबतच तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता.
8/10

कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या कामाचा विचार करून तुमच्यावर काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, यासोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भौतिक सुख मिळेल.
9/10

वृषभ रास : दिवाळीनंतरच्या काळात वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांचा समाजात मान-सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात तसेच त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो.
10/10

उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. याशिवाय तुमच्या कामाचा विचार केल्यास तुमचा पगार प्रमोशनसोबत वाढू शकतो. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात.
Published at : 06 Nov 2024 01:56 PM (IST)
आणखी पाहा























