एक्स्प्लोर

नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा

नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांत हिंदू जनजागरण रॅली व मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभष भाषण केल्यामुळे मुस्लीम समाजाचा रोष त्यांच्याबद्दल वाढला आहे.

सिंधुदुर्ग : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होत आहे. मात्र, मनसे, वंचित, एमआयएम (MIM) आणि परिवर्तन शक्तीच्या माध्यमातून इतर नेतेमंडळीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिला असून अकबरुद्दी ओवैसी यांनी नासिर सिद्दिकी यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना सिद्दिकी यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. नितेश राणेंचं नाव न घेता त्यांना विधानसभेत घुसून मारू, अशा शब्दात त्यांनी धमकी दिली आहे. एक पाच फूट, 5 रुपयावाला पेप्सी मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करतो, एवढी हिंमत वाढलीय. पण मी तुम्हाला सांगतो विधानसभेत घुसूर मारण्याची ताकद ठेवतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता थेट माजी केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) पलटवार केला आहे.

नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांत हिंदू जनजागरण रॅली व मुस्लिमांविरुद्ध प्रक्षोभष भाषण केल्यामुळे मुस्लीम समाजाचा रोष त्यांच्याबद्दल वाढला आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांनी त्याच भाषणांचा संदर्भ देत भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीका करताना  वादग्रस्त वक्तव्य केले होते. नितेश राणे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष विधानसभेत घुसून मारू, असं सिद्दिकी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अमखास मैदानावर अकबर ओवेसी यांची मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलतांना सिद्दीकी यांनी हे वक्तव्य केले. त्यावरुन, आता राजकीय वाद पेटला असून नासिर सिद्दिकी यांच्या वक्तव्यावर थेट माजी केंद्रीयमंत्री व खासदार नारायण राणेंनी पलटवार केलाय. नारायण राणेंनी जशात तसे उत्तर देत नितेश राणे आणि हिंदूंविरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, अशा शब्दात इशारा दिला आहे. त्यामुळे, एमआयएम आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यांवरुन जुंपली आहे. 

एम्‌आयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सि‌द्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणाऱ्यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे आणि हिंदू विरोधात गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील. अशी पोस्ट सोशल मीडियावर नारायण राणे यांनी केली आहे. 

हेही वाचा

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget