एक्स्प्लोर

Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!

मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर शिंदे यांनी सांगितलं जा, दिलं आरक्षण तुमच्या हातात तरी आहे का? राज्याच्या हातात तरी आहे का अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी फटकारले.

Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक मराठवाड्यामध्ये तापला असतानाच आणि मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती फटका देणार याची चर्चा रंगली असतानाच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला हात घालत हे न शक्य नसल्याचं पुन्हा एकदा सांगितले. लातूरमध्ये आज राज ठाकरे यांची मनसे उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी रेनापुरात बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांसह निविरोधकांसह हल्लाबोल केला. 

मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं?

राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने इतिहास सांगताना म्हणाले की, मुंबईमध्ये 1999 मध्ये पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी मोर्चा आला होता. या मोर्चामध्ये कोण कोण होतं हे मला आजही आठवतं. त्यावेळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होते. व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेची लोकं गेली होती. या सर्वांनी मराठा आरक्षण देऊ असं म्हटलं होतं. मग आजपर्यंत आरक्षण का मिळालं नाही? यांना कोणी अडवलं? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की एकाचवेळी चौघांनी आरक्षण देणार सांगितले होते,तर ते का दिले गेले नाही? या सर्व घडामोडींना वीस पंचवीस वर्ष झाली आहेत, आतापर्यंत यांनी फक्त झुलवण्याचं काम केलं असल्याचं आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.

तुमच्या हातात तरी आहे का? 

मुंबईमध्ये मोर्चा आल्यानंतर शिंदे यांनी सांगितलं जा, दिलं आरक्षण तुमच्या हातात तरी आहे का? राज्याच्या हातात तरी आहे का अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांनी फटकारले. तमिळनाडूमध्ये आरक्षण दिले गेलं, पण तो विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून त्यावरती कोणताही निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. जी गोष्ट घडू शकत नाही त्यासाठी आपण भांडत आहोत. आपल्या साधून संतांनी ही आपल्याला शिकवण दिली आहे का? अशी त्यांनी विचारणा केली. मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला होता. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महान संत शरदचंद्र पवार यांनी हिंदुत्वाच्या गोष्टी कशा छाटायच्या याचा विचार सुरू केला आणि महाराष्ट्र जाती जातींमध्ये विभागला गेल्याची टीका राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. जात प्रत्येकालाच प्रिय असते त्यामध्ये गैर काहीच नाही. मात्र दुसऱ्या जाती बद्दल द्वेष सुरू होतो ते वाईट असतं, असे त्यांनी सांगितलं. शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकडे लक्ष नाही. तरुण शेतीकडे वळत नाहीत, कृषी विद्यापीठे थंडगार पडली आहेत. आत्महत्यांवर अभ्यास होत नाही. महिला तरुणींचे प्रश्न आहेत. महिलांना पळवून नेण्याचे सर्वाधिक प्रमाण मराठवाड्यामध्ये आहे, असा महाराष्ट्र कधीच नव्हता, अशी खंत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. 

जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाच मी सांगितलं

तत्पूर्वी, राज ठाकरे म्हणाले की त्यानंतर जिल्हा जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले. अत्यंत शिस्तबद्ध निघालेले मोर्चे मी महाराष्ट्राचे इतिहासामध्ये असे कधीच पाहिले नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र त्या मोर्चाचं काय झालं? का आरक्षण मिळालं नाही अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. ते म्हणाले की मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणाला बसले. आता पहिल्यांदा निवडणूक लढवणार म्हणाले, त्यानंतर आता पाडणार म्हणत आहेत. मात्र आरक्षण कसे देणार आहात ते सांगा हे मी विचारपूर्वक बोलत असल्याचा राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणावर फक्त झुलवण्याचं काम होत आहे. अशा प्रकारे आरक्षण मिळू शकत नसल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हाच मी त्यांना सत्य परिस्थिती सांगितली होती. हा किचकट आणि तांत्रिक विषय असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यासाठी लोकसभेमध्ये कायदा बदलावा लागेल सुप्रीम कोर्टातून आदेश घ्यावा लागेल आणि एकट्या महाराष्ट्रासाठी, एका जातीसाठी या सर्व गोष्टी केल्यास प्रत्येक राज्यातील इतर जाती सुद्धा उठून बसतील आणि ते परवडणार नाही. हे होणार नाही हे प्रत्येक पक्षातील नेत्याला माहित असल्याचं ते म्हणाले. जर कोणी आरक्षण देतो म्हणाला तर पहिल्यांदा कस देणार हे पहिल्यांदा विचारा, असे राज ठाकरे यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवालChitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
मोठी बातमी! कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Embed widget