एक्स्प्लोर

एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला

आधी बारदाना नव्हता म्हणूनच सोयाबीन विक्री रखडली, आता खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी रांगच रांग आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत.

Soybean News: गेल्या वर्षभराहूनही अधिक काळासाठी सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांची सोयाबीनच्या विक्रीसाठीची धडपड सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प होती. आता खरेदी केंद्र सुरू झाली आहेत पण सोयाबीनचा काटा होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Soybean Farmer)राज्यातील सोयाबीन खरेदी आता केवळ 31 जानेवारीपर्यंतच सुरू राहणार असल्याने प्लीज सोयाबीन खरेदी केंद्रांच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत.  हमीभावाने सोयाबीन  विक्री करता यावी यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सोयाबीनचा काटा होण्यास 3-3 दिवस प्रतीक्षा करावी लागत असून काही जणांना केंद्रावरच मुक्काम करावा लागतोय. सोयाबीन खरेदीची मुदत अवघ्या चार दिवसात संपणार असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Soybean Procurement Centre)

सोयाबीन शेतकऱ्यांसाठी एका बाजूला महायुतीच्या कोट्यवधींच्या बाता सुरू असताना खरेदी केंद्रांच्या ढिसाळ व्यवस्थेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला आहे. आधी बारदाना नव्हता म्हणूनच सोयाबीन विक्री रखडली, आता खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी रांगच रांग आहे. त्यामुळे हजारो शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत. वाहनांच्या किरायाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. (Soybean)

लातूरचे 14 हजार शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत

लातूर जिल्ह्यात 16 ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून हमीभावाने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास 47 हजार 671 शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली असून, यापैकी जवळपास बारा हजार 463 शेतकऱ्यांच्या एकूण जवळपास तीन लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आलीय. ऑनलाईन नोंदणी केलेले जवळपास 14 हजार शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. पाच दिवसांनी खरेदीची मुदत संपणार असल्यामुळे या मुदतीत सोयाबीनची खरेदी होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय. (Soybean Purchase)

खरेदी केंद्रातील प्रतीक्षा आर्थिक गणित जुळेना 

खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेले वाहने किमान चार ते पाच दिवस काटा होण्यासाठी लागत असल्याने किराया भरमसाठ होत आहे. एका कट्ट्याला 80 ते 100 रुपये किराया पडतो... चार दिवस होल्डिग चार्जेस बाराशे ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. ड्रायव्हर भत्ता वेगळा. स्वतःच्या जीवनाचा खर्च वेगळा.या सर्व प्रतीक्षेत प्रती ट्रॅक्टर किमान नऊ ते 14 हजारापर्यंत खर्च होतोय यामुळे क्विंटल मागे आठशे रुपयाचा वाढून मिळणारा मूल्य नको तिथे खर्च होतो. पाच ते सहा दिवस वाढणारा मनस्ताप वेगळाच. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी वाट पाहण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; मुख्यमंत्र्यांची मागणी कृषीमंत्र्यांकडून मान्य; सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget