एक्स्प्लोर

पानाच्या लागवडीसाठी 75000 रुपयांचं अनुदान, 'या' राज्य सरकारची अनोखी योजना

पानाची (Leaf) वाढती मागणी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकार (UP Govt) पानाच्या लागवडीला चालना देण्याचे काम करत आहे.

Leaf Farming : पानाची (Leaf) वाढती मागणी लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकार (UP Govt) पानाच्या लागवडीला चालना देण्याचे काम करत आहे. पानाच्या लागवडीला चालना देण्यासाठी, सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे. जेणेकरुन शेतकरी पानाच्या लागवडीकडे वळतील. उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना 75000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. ही संपूर्ण योजना काय आहे जाणून घेऊया.

उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेअंतर्गत, देसी, बांगला, कलकतिया, कापुरी, रामटेक, मंघाही, बनारसी इत्यादी पानांच्या प्रगतीशील प्रजातींच्या लागवडीवरच अनुदान दिले जाणार आहे. म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याने या वाणांची लागवड केल्यास त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल.1500 चौरस मीटरमध्ये पानाची लागवड करण्यासाठी 1,51,360.00 रुपये प्रति बॅरेजा खर्च येतो. त्यातील 50 टक्के रक्कम सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे सरकार शेतकऱ्यांना 75,680.00 रुपये देणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे. भारतात फार पूर्वीपासूनच पानाची लागवड (leaf farming) केली जाते. पानाचा उपयोग खाण्याबरोबरच पूजेतही करतात. या पानातही अनेक औषधी गुणधर्म असतात.

शेतकऱ्यांना पानाच्या लागवडीसाठी तांत्रिक सहकार्य केलं जाणार

उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेअंतर्गत, देसी, बांगला, कलकतिया, कापुरी, रामटेक, मंघाही, बनारसी इत्यादी पानांच्या प्रगतीशील प्रजातींच्या लागवडीवरच अनुदान दिले जाईल. म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्याने या वाणांची लागवड केल्यास त्यालाच या योजनेचा लाभ मिळेल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेतकऱ्यांना पानाच्या लागवडीच्या तांत्रिक ज्ञानाचे तांत्रिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्यही केले जाईल. निवडलेल्या जिल्ह्यांतील निवडक लाभार्थ्यांसाठी विभागीय संशोधन केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यामध्ये पान संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

अनुदानाची रक्कम कशी भरणार?

अनुदानाची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानात मिळालेली रक्कम सुपारी लागवडीसाठी न वापरल्यास अनुदानाची रक्कम परत केली जाईल, असे करारपत्र भरावे लागणार आहे. लाभार्थ्याकडून दर्जाप्रमाणे काम होत नसल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन वसुली करण्यात यावी.

महत्त्वाच्या बातम्या:

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण, तरुणानानं घेतला धाडसी निर्णय; आज वर्षाला कमावतोय एवढे पैसे

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget