सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण, तरुणानानं घेतला धाडसी निर्णय; आज वर्षाला कमावतोय एवढे पैसे
भारतात फार पूर्वीपासूनच पानाची लागवड (leaf farming) केली जाते. पानाचा उपयोग खाण्याबरोबरच पूजेतही करतात.
Success Story : भारतात फार पूर्वीपासूनच पानाची लागवड (leaf farming) केली जाते. पानाचा उपयोग खाण्याबरोबरच पूजेतही करतात. या पानातही अनेक औषधी गुणधर्म असतात. दरम्यान, या पानशेतीतून उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे नशीब बदलले आहे. भोलेंद्र चौरसिया असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न होतं. पण ते पूर्ण झालं नाही. मात्र, या तरुणाने शेतीत यशस्वी प्रयोग करुन दाखवला आहेय
सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती पण..
आज आपण रायबरेली जिल्ह्यातील प्रगतशील तरुण शेतकरी भोलेंद्र चौरसियाबद्दल यांच्या पान शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शेतकऱ्याशी संवाद साधताना भोलेंद्रने 2019, 2020 आणि 2021 मध्ये सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला होता. पण कोरोना लॉकडाऊनमुळे भरती थांबली आणि माझे स्वप्न भंगले. कारण तोपर्यंत त्याचे वय जास्त झाले होते. पण आम्ही हार मानली नाही आणि आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती केली. भोलेंद्र चौरसिया यांनी सांगितले की, आज पानाच्या लागवडीतून वार्षिक उत्पन्न 3 ते 4 लाख रुपये मिळत आहेत.
एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च
पानाची शेती करण्यासाठई सरासरी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. पहिल्या वर्षी यातून फारसा नफा मिळत नाही. मात्र दुसऱ्या वर्षी वार्षिक उत्पन्न दीड ते दोन लाख रुपये मिळत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. पानाच्या मुख्य प्रजाती देसी, महोबा आणि बंगाली पानाची प्रामुख्याने लागवड केली जाते. भोलेंद्र सांगतात की, पान वाराणसी, फैजाबाद, लखनौ आणि रायबरेलीच्या बाजारात विक्रीसाठी नेले जाते. जिथे आम्हाला चांगला भाव मिळतो. त्याचबरोबर पानाची लागवड केल्यानंतर माझी जीवनशैलीही बदलली आहे. आगामी काळात हे काम आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रायबरेली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक पानाची लागवड
रायबरेली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक पानाची लागवड करतात. त्यासाठी त्यांना विभागाकडून वेळोवेळी प्रशिक्षणही मिळत आहे. याशिवाय सुपारीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कृषी विकास योजनेंतर्गत 50 हजार रुपयांचे अनुदान मिळत आहे. पानाची लागवड फेब्रुवारी महिन्यापूर्वी केली जाते. अंदाजे दहा बिस्वा जमिनीवर बरेजा तयार करण्यासाठी 1 ते 1.50 लाख रुपये खर्च येतो. आज यूपी सरकारही शेतकऱ्यांना या शेतीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे भोलेंद्र चौरसिया यांनी सांगितलं. या पानांची लागवड नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लागवड करावी.
महत्त्वाच्या बातम्या: