Cow milk price : दिलासादायक! दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, लवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ...
पुढील काही दिवसात गायीच्या दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या गायीच्या दुधाला 27 ते 30 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे.
Cow milk price : राज्यातील दूध उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पुढील काही दिवसात गायीच्या दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या गायीच्या दुधाला 27 ते 30 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. तर या दरामध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, दुध भुकटी आणि लोणी (बटर) यामध्ये तेजी आल्यानं दर वाढणार आहेत. त्यामुळे दुध उत्पादकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कोरोनच्या संकटाचा खूप मोठा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसला होता. 21 ते 22 रुपयांच्या आसपास गायीच्या दुधाला दर मिळत होता. त्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसत होता. मात्र, आता कोरोनचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे दुधाच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. तसेत दूध भुकटीला वाढणारी मागणी लक्षात घेत लवकरच आणखी दुधाच्या दरात वाढ होणार असून दूध उत्पादकांना 33 ते 34 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे.
गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याचा निर्णय राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी घेतलाय. या निर्णयामुळे यापुढे गाईच्या दुधाचा खरेदी दर यापुढे राज्यभर सारखाच राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता गाईच्या दुधासाठी किमान 1 रुपया तर, कमाल 3 रुपयांची दरवाढ मिळणार आहे. खरेदी दरात वाढ झाली असली तरी विक्री दर कायम राहणार आहे. राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची रविवारी बैठक झाली होती. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या 30 रुपयांपेक्षा कमी दूध दर असलेल्या दूध संघाचे खरेदी दर वाढणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघही अडचणीत आले आहेत. शिवाय दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
राज्याच्या सध्याच्या स्थितीला गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान 27 रुपये तर, कमाल 29 रुपयांच्या आसपासचा दर मिळ आहे. त्यामुळे सध्या कमाल प्रतिलिटर 29 रुपये दर असलेल्या दूध संघाचा खरेदी दर आता 30 रुपये इतका होईल. पर्यायाने या दूध संघांकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर 1 रुपया दरवाढ मिळेल. याउलट किमान 27 रुपये दर असलेल्या दूध संघाचा खरेदी दर आता 30 रुपये होणार आहे. त्यामुळे अशा दूध संघांचा खरेदी दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढणार आहे. तर दूध भुकटी आणि लोणी याला आलेल्या तेजीमुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: