Sugarcane : अद्याप राज्यात पाच ते सहा लाख टन उसाचे गाळप शिल्लक, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर
राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अतिरिक्त उसाचे गाळप करण्याचं मोठं आव्हान साखर कारखानदारांपुढे आहे.
Sugarcane farmers : गेल्या चार महिन्याहून अधिक काळ झाले राज्यात उसाचे गाळ सुरू आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने शेतकरी चिंतेत आहेत तर अतिरिक्त उसाचे गाळप करण्याचं मोठं आव्हान साखर कारखानदारांपुढे आहे. सध्या पाच ते सहा लाख टन ऊस अद्याप शिल्लक आहे. अशातच काही भागातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परावानगी घेतल्याशिवाय साखर कारखाने बंद करु नयेत असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. याबाबत खुद्द सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीचं अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अतिरिक्त असणाऱ्या सर्व उसाचे गाळप होणर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक ठिकाणी 17 ते 18 महिने झाले तरी अद्याप ऊस कारखान्याला गेला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात ऊसाचे गाळप रखडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यंदा राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले आहे. असे असले तरी गाळप पूर्णच होणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले आहे.
यंदाचा ऊस गळीत हंगाम हा 15 ऑक्टोबर 2021 ला सुरु झाला होता. आत्तापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप झाले आहे. अद्यापही पाच ते सहा टन उस शेतातच आहे. त्यामुळे आपल्या उसाचे गाळप होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांना आहे. तांत्रिक बिघाडामुळे काही साखर कारखाने हे बंद आहेत. त्यामुळे गाळपाचा प्रश्न अधिक तीव्रतेने समोर येत आहे. दरम्यान, गाळप बंद करण्यापूर्वी साखर कारखान्याच्या संचालकांना साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वीच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्यासंबधात कारखाना व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय कारखाना क्षेत्रातील ऊसाचे गाळप शिल्लक राहणार नाही याची जबाबदारी त्या कारखान्यांचीच राहणार असल्याचे सांगितले आहे. यंदा क्षेत्रात वाढ झाल्याने ही समस्या उद्भवली आहे.
यंदा राज्यात उसाचे विक्रमी क्षेत आहे. त्यामुळे साखरेचं देखील विक्रमी उत्पादन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. दरम्यान, अतरिक्त उसाचा मुद्दा असल्याने कारखान्यांचा गाळप हंगाम यंदा लांबणीवर जाणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या उसाचे वजन घटणार आहे. तर दुसरीकडे ब्राझीलमधील दुष्काळी स्थिती आणि कोरोनाच्या निर्बंधामध्ये येत असलेली शिथीलता यामुळे साखर उद्योगाला चालना मिळत आहे. देशांतर्गत साखरेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे, त्यामुळे अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीलाही चांगली मागमी आहे. तसेच यंदा इथेनॉलच्या उत्पादनातही वाड होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: