एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Devendra Fadnavis on Loan Waiver: 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात आल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis on Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची (Loan Waiver) महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सरकार कर्जमाफी योजना राबवणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. याशिवाय, जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली. या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीने ही कर्जमाफी अपुरी असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? याबाबत निकष सांगितले आहेत. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा मी केली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेचं होणार नाही, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं सोसायटीची कर्जमाफी होणार नाही. आम्ही दोन लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे असे कोणीही दिलेलं पीक कर्ज आम्ही माफ करणार आहोत, असे त्यांनी म्हटले. 

Devendra Fadnavis on Loan Waiver: 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे हा आहे की, कर्जमाफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत. 30 जूनच्या आधी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता समिती या सगळ्यावर काम करत आहे. जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे देखील त्यांनी सांगितले. 

Loan Waiver : कोणते शेतकरी पात्र ठरणार? 

- दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी. 

- ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील. 

- 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.

- नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50  हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.

आणखी वाचा 

LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Embed widget