(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tomato : टोमॅटोच्या एका कॅरेटला दोन हजार रुपयांचा दर, बीडच्या शेतकऱ्यानं तोफा वाजवून व्यक्त केला आनंद
टोमॅटोला चांगला दर मिळाला म्हणून आनंदित झालेल्या एका शेतकऱ्यानं चक्क तोफा वाजवून आपला आनंद साजरा केला.
Tomato News : सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाली आहे. अनेक भागात टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यामुळं दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो आहेत, त्यांना मोठा फायदा होत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, बीडच्या मार्केटमध्ये (Beed Market) सध्या टोमॅटोच्या एका कॅरेटला दोन हजार रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोला चांगला दर मिळाला म्हणून आनंदित झालेल्या एका शेतकऱ्यानं चक्क तोफा वाजवून आपला आनंद साजरा केला.
बीडच्या बाजारामध्ये 130 ते 140 रुपये किलोने टोमॅटोची विक्री
बीडच्या मार्केटमध्ये सध्या टोमॅटोच्या एका कॅरेटला दोन हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने आनंदित झालेल्या शेतकऱ्याने चक्क तोफा वाजून आपला आनंद साजरा केला. बीडच्या लढत मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला दोन हजार रुपये ते 2300 रुपयांचा भाव मिळत आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आनंदी झाले आहेत. एका शेतकऱ्याच्या 22 किलोच्या कॅरेटला शनिवारी दोन हजार रुपयांचा भाव मिळाला. यावेळी आनंदित झालेल्या या शेतकऱ्याने चक्क मार्केटमध्येच तोफा वाजवून आपला आनंद साजरा केला. कधी नव्हे ते टोमॅटोला ठोक आणि किरकोळ बाजारामध्ये चांगला दर मिळत आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले आहेत. तर दुसरीकडे बीडच्या बाजारामध्ये 130 ते 140 रुपये किलोने टोमॅटोची विक्री केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: