रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला 'दि ग्रेट MS Dhoni'; पाहा व्हिडिओ
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका उद्यापासून (27 जानेवारी) खेळवली जाणार आहे. पहिला टी20 सामना रांची्च्या मैदानात रंगणार आहे.
![रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला 'दि ग्रेट MS Dhoni'; पाहा व्हिडिओ IND vs NZ T20 MS Dhoni Meets Indian Cricket Team Practicing in Ranchi Ahead India vs New Zealand 1st T20- Watch Video रांचीमध्ये रंगणार पहिली टी20 मॅच, टीम इंडियाच्या भेटीला आला 'दि ग्रेट MS Dhoni'; पाहा व्हिडिओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/26/29db7f07d73242bac3931c8059af22921674736139760323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MS Dhoni Meets Team India : भारतीय क्रिकेट संघ (Team India) एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान उद्या अर्थात 27 जानेवारीपासून टी20 सामने खेळवले जाणार असून पहिला सामना रांची येथे होणार आहे. दरम्यान पहिल्या टी20 सामन्यासाठी संघ रांची येथे पोहोचला असताना एका खास व्यक्तीनं खेळाडूंना भेट दिली आहे. ही व्यक्ती म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनी हा रांचीचाच असल्यानं टीम इंडिया त्याच्या शहरात येताच त्याने आवर्जून खेळाडूंची भेट घेतली.
दरम्यान या भेटीचा व्हिडीओ बीसीसीआयनं त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्याला कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की पाहा टीम इंडियाला रांची येथे भेटण्यासाठी कोण आलं आहे महान एम.एस. धोनी. दरम्यान या व्हिडीओवर नेटकरीही बऱ्याच कमेंट्स करताना दिसत आहेत. व्हिडीओत आपण पाहू शकतो ईशान किशन, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे खास गप्पा-टप्पा धोनीबरोबर करताना दिसत आहेत. तर सुंदरसह इतरही कोचिंग स्टाफ धोनीसोबत बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे धोनीचा फिटनेस अजूनही वाखणण्याजोगा असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे.
पाहा VIDEO -
Look who came visiting at training today in Ranchi - the great @msdhoni! 😊#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/antqqYisOh
— BCCI (@BCCI) January 26, 2023
एकदिवसीय मालिकेनंतर आता लक्ष्य टी20
भारतानं न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा सामना 8 गडी राखून जिंकल्यावर तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमक दाखवली. दरम्यान आता टी-20 मालिकेत भारत हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडू घेऊन उतरणार असून नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगं असेल...
भारताचा टी20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 27 जानेवारी 2023 | रांची |
दुसरा टी-20 सामना | 29 जानेवारी 2023 | लखनौ |
तिसरा टी-20 सामना | 01 फेब्रुवारी 2023 | अहमदाबाद |
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)