एक्स्प्लोर
Advertisement
Septic tank | सेप्टिक टॅंक साफ करताना गॅसमुळे गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू | ठाणे | ABP Majha
ठाण्यामध्ये सेप्टिक टॅंक साफ करताना श्वास गुदमरल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत पाच आणखी कामगारांची प्रकृती बिघडली आहे. अमित पुहाल (20), अमन बादल (21) , अजय बुमबक (24) अशी मृतकांची नावं आहेत. तर विजेंद्र हटवाल, मंजित वैद्य, जसबिर पुहाल, रुमर पुहाल, अजय पुहाल या पाच कामगारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्राईड प्रेसिंडेन्सी लक्झेरिया, ढोकाळी नाका, ढोकाळी, ठाणे (प.) येथे वरील आठ कामगार STP Plant (Sewage Treatment Plant) च्या सफाईचे काम करत होते. दुपारपासून सेप्टिक टॅंकमधील पाणी काढण्याचं काम एका ठेकेदाराला दिलं होतं. रात्री ते काम पूर्ण झालं आणि गाळ काढण्यासाठी हे कामगार आत उतरले. मात्र, आतील गॅसमुळे त्यांचा श्वास गुदमराला आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement