Nashik : महिलांचे पाण्यासाठीचे हाल थांबणार ; खरशेत गावासाठीच्या नळपाणी योजनेला प्रशासकीय मान्यता
बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची.. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खरशेत गावात पाण्यासाठी सुरु असलेले हाल एबीपी माझाने दाखवले होते.. यानंतर सरकारने या वृत्ताची दखल घेतली होती.. अखेरीस खरशेत गावात नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालीय..गावातील घराघरात नळपाणी योजने अंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे.. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी खरशेत ग्राम पंचायतीतल्या आदिवासी पाड्यांना भेट देणार आहेत.. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तत्काळ शिवसैनिकांना तास नदीवर लोखंडी पूल बसवण्याचे दिले होते आदेश दिले होते.. त्यानंतर आता नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महिलांचे हाल थांबणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या























