Nawab Malik PC : आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड Mohit Kamboj तर Sameer Wankhede पार्टनर
Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी म्हटलं की, 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही, असंही ते म्हणाले.
नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा हा व्यक्ती आहे. सध्या भाजपमध्ये असलेले आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एका नेत्यामागे हा फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.
नवाब मलिक यांनी म्हटलं की, 18 कोटींचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर सैल याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.
नवाब मलिक यांनी म्हटलं की, माझ्यावर आरोप करण्यात येतो आहे की मी प्रभाकर सैलला शिकवून पोलीस ठाण्यात पाठवलं. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री यांना देखील यांना सांगितलं. मुख्यमंत्री यांनी डी जी पांडे यांना सांगितलं. त्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यानंतर पालघरची टीम मुंबईत येऊन थांबली होती. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो. त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले.