एक्स्प्लोर

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला

Iran Israel Confilct  Impact On LPG Price :  पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आले.

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतंय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय गॅसचे ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारने मात्र सध्या देशात एलपीजी, पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

आधी 15 दिवसांवरून 21 दिवस, आता 25 दिवस

पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर 15 दिवसांवरून 21 दिवस केले होते. मात्र आता हा कालावधी आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन बुकिंगदरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे. याआधी त्याची किंमत 853 रुपये होती. तर मुंबईमध्ये ही किंमत 912 रुपये इतकी आहे. 

LPG Price In Mumbai Delhi : मोठ्या शहरांमधील एलपीजीचे दर

मुंबई: 912.50

कोलकाता: 939

चेन्नई: 928.50

एलपीजी गॅसमधील ही नवीन दरवाढ 7 मार्चपासून लागू झाली आहे.

LPG Price : व्यावसायिक सिलेंडरही महाग

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या सिलेंडरची किंमत 1,883 रुपये झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कॉमर्शियल एलपीजीच्या दरात 302.50 रुपयांची वाढ झाली आहे.

LPG Gas Booking News Rule : उज्ज्वला योजनेचा लाभ कायम

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना दरवर्षी 12 सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. पश्चिम आशियामधील परिस्थिती लक्षात घेता सरकारने एलपीजी पुरवठा आणि बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील काळात आणखी काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

Petrol Diesel Price Hike : पेट्रोलच्या किमती वाढणार नाहीत

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपुर्ण जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच केंद्र सरकारच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, याची ग्वाही सरकारी सूत्रांनी दिली आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Vedpathak White Line Controversy: आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न
आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न
Siddhivinayak Ganapati Mandir : सिद्धिविनायक मंदिर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करणार, 500 कोटींच्या निधीत कोणतीही टक्केवारी घेणार नाही; सदा सरवणकरांनी स्पष्टच सांगितलं
सिद्धिविनायक मंदिर उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे करणार, 500 कोटींच्या निधीत कोणतीही टक्केवारी घेणार नाही; सदा सरवणकरांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
Rajya Sabha Election 2026 Navneet Rana: नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
नवनीत राणांचं राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगलं, रवी राणा सुनेत्रा पवार-पार्थ पवारांबाबत स्पष्टच म्हणाले...
Navneet Rana On Rajya Sabha Election 2026: पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
पार्थ आणि सुनेत्रा पवारांची 'ती' अट मान्य नव्हती; राज्यसभेवरील मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितला, पोस्टने नवा ट्विस्ट!
Embed widget