Mumbai Local Pass : Dadar मध्ये कशाप्रकारे सुरु आहे क्यूआर कोड पासची प्रक्रिया? ABP Majha
कोरोनामुळे सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे... त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येतेय... मुंबईतल्या आणि लगतच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरुन क्यूआर कोड पास प्रक्रियाचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी घेत आहेत..
दादर म्हणजे मुंबईतलं सर्वात महत्त्वाचं रेल्वे स्थानक.... तिथं कशाप्रकारे क्यूआर कोड पासची प्रक्रिया सुरु आहे, पाहुयात























