Zero Hour : सॅम पित्रोदांचं वक्तव्य, संपत्तीच्या मुद्यावरून काँग्रेस पुन्हा अडचणीत
Zero Hour : सॅम पित्रोदांचं वक्तव्य, संपत्तीच्या मुद्यावरून काँग्रेस पुन्हा अडचणीत
सॅम पित्रोदा.. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे सल्लागार .. आता जेव्हा हेच सॅम काही बोलतात.. तेव्हा त्याला राजकीय महत्व येतंच.. आणि वादही...
आता वाद का म्हणालो.. सॅम पित्रोदा यांच्या संपत्ती वितरण विधानावर गृहमंत्री अमित शाह यांनी सकाळी भरपूर टीका केली. सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा पूर्णपणे उघडा पडला आहे असा हल्ला त्यांनी चढवला. यूपीए काळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केेलेल्या एका जुन्या विधानाची मोदीशाहा आठवण करुन देत आहेत, ज्यात मनमोहन सिंह म्हणाले होते की या देशातील संसाधनांवर अल्पसंख्याकांचा... त्यातही मुस्लिमांचा सर्वात आधी अधिकार आहे.. तसंच राहुल गांधी प्रत्येक भाषणात सर्वे करणार असल्याचं सांगत आहेत. या सगळ्यावर भाजपकडून टीका होत आहे. आज छत्तीसगडमधील सरगुजा इथल्या सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेससाठी एक वेगळं स्लोगन सुद्धा तयार केलंय. सॅम पित्रोदा यांच्या विधानामुळे प्रचारकाळात भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे हे नक्की.