एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकलेच ठरले 'बाजीगर', शरद पवार गटाच्या गणेश गितेंचा पराभव

Nashik East Assembly Constituency : 2019 च्या निवडणुकीत उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता.

नाशिक : मंदिरांची नगरी कुंभनगरी ही नाशिकची खरी ओळख आहे. ही ओळख ज्या परिसरामुळे जगभर झाली तो पंचवटी गोदावरी काठाचा परिसर ज्या भागात मोडतो तो हा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ (Nashik East Assembly Constituency) होय. या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले (Rahul Dhikle) हे विद्यमान आमदार आहेत. राहुल ढिकले यांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले गणेश गीते (Ganesh Gite) यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले राहुल ढिकले विरुद्ध गणेश गीते या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राहुल ढिकले यांनी बाजी मारली आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राहुल ढिकले सलग दुसऱ्यांचा आमदार झाले आहेत.

राहुल ढिकले 154671 
गणेश गीते 67138

राहुल ढिकले 87535 हजार मतांच्या लीडने विजयी

शहरातील तीन मतदारसंघापैकी विस्ताराने मोठा असणारा नाशिक पूर्व मतदारसंघ असून भाजप-शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या या मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला होता. उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित ४७ हजार ९२४ मते प्राप्त करून विजय संपादित केला होता. 2014 मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप तब्बल 78 हजार 554 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे चंद्रकांत लवटे दुसऱ्या तर काँग्रेसचे उद्धव निमसे तिसऱ्या स्थानी होते. मनसेचे उमेदवार रमेश धोंगडे यांना अवघी 12 हजार 437 मतं मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अ‍ॅड. राहुल ढिकले यांना 85 हजार 232 मते मिळाली, तर बाळासाहेब सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली. या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला होता.

राहुल ढिकले यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

यंदा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि महाविकास आघाडीचे गणेश गीते यांच्यात मुख्य लढत झाली. तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात असून दोन जणांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या दशकापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. या चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांनी बाजी मारली.

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नांदगाव मतदारसंघात तिरंगी लढत, सुहास कांदेंसमोर समीर भुजबळ, गणेश धात्रक यांचे आव्हान, कोण उधळणार गुलाल?

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget