Rohit Patil Tasgaon : तासगाव - कवठेमहांकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित
Rohit Patil Tasgaon : तासगाव - कवठेमहांकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित
तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विरोधात मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याने त्यांना 'घड्याळ' हातात बांधावे लागणार असल्याची चर्चा आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे रोहित पाटील व प्रभाकर पाटील अशी दुरंगी लढतीची शक्यता आहे.
प्रभाकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित आहे. मात्र, महायुतीत हा मतदारसंघ भाजपशिवाय ज्या मित्रपक्षाच्या वाट्याला जाईल. त्या पक्षात प्रभाकर पाटील यांना प्रवेश करावा लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे प्रभाकर पाटील लवकरच घड्याळ हातात बांधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माजी खासदार संजय पाटील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे लवकरच मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे.