Vinayak Raut : निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा झाली - विनायक राऊत
Vinayak Raut : निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात चर्चा झाली - विनायक राऊत
हेही वाचा :
भाजपने 99 विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. बंडखोरीचे पहिले निशाण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून फडकावले जाण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून (Shrigonda Vidhan Sabha) भाजपने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून भाजपच्या जुन्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते (Suvarna Pachpute) यादेखील इच्छूक होत्या. त्यामुळे प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच सुवर्णा पाचपुते यांच्याकडून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांनाच तिकीट दिल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईतील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते हे दोघेही त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.