Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Guru Vakri 2024 : गुरुची वक्री चाल काही राशींसाठी फार शुभ समजली जाते. गुरु वक्रीमुळे 3 राशींना सोन्याचे दिवस येणार आहेत, या राशींचं नशीब पालटणार आहे.
![Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ Guru Vakri 2024 In Taurus these zodiac signs will get lucky golden time will start earn lot of money Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/02/4f65f833453b70260c41a124101f64ed1727847350441660_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Guru Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी गुरु बृहस्पति वृषभ राशीत वक्री (Guru Vakri 2024) झाला आहे. 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुरू या स्थितीत राहील, ज्याचा शुभ परिणाम काही राशींवर होईल. मान्यतेनुसार, कुंडलीत बृहस्पति ग्रहाच्या मजबूत स्थितीमुळे व्यक्तीला जीवनात सुख, समृद्धी आणि भाग्य प्राप्त होतं. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर त्याच्या अडचणी वाढू शकतात. आता गुरू वक्रीमुळे नेमक्या कोणत्या राशींचं नशीब पालटणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
गुरूची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. बृहस्पति तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात प्रतिगामी आहे. या काळात या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळू शकते. पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या कालावधीत तुम्ही मालमत्ता किंवा फ्लॅट खरेदी करू शकता. तुमचं उत्पन्न जबर वाढेल. तुम्ही तुमच्या गरजा सहज पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीसाठी गुरूची वक्री गती आर्थिक बाबतीत शुभ ठरेल. बृहस्पति तुमच्या कुंडलीच्या 12 व्या घरात वक्री आहे. या काळात तुमच्या कौटुंबिक समस्या कमी होतील. तुमचं उत्पन्न वाढेल. तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नोकरीत बदल होण्याचीही शक्यता आहे. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील. नोकरदार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची चिन्हं आहेत. कुटुंबात सुख-शांति राहील.
सिंह रास (Leo)
गुरू तुमच्या राशीपासून 10व्या घरात वक्री आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री स्थिती खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बँक बॅलन्सही वाढेल. कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ मिळू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा काळ चांगला राहील. तुमची अपूर्ण कामं तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. या काळात तुमचं आरोग्यही चांगलं राहील. एकंदरीत तुम्हाला चौफेर लाभ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)