एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Bollywood Arth Movie: आजच्या टिंडरच्या जमान्यात तब्बल 42 वर्ष जुना चित्रपट रिलेवेंट होतोय, हे आश्चर्यकारकच आहे. 'अर्थ' (Arth) असं या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाला कल्टचा दर्जा मिळाला आहे.
Movie on Extra Marital Affair: बॉलिवूड (Bollywood) आपल्या भारतीयांच्या आयुष्याचं अविभाज्य घटक बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. आजवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काहींना चांगला, तर काहींना अगदीच वाईट प्रतिसाद मिळाला. पण, बॉलिवूडमध्ये असेही काही चित्रपच फार वर्षांपूर्वी होऊन गेलेत. जे आताच्या काळाला, परिस्थितीला अगदी समर्पक ठरतात. असाच एक चित्रपट साधारणतः 42 वर्षांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी बनवला होता. 42 वर्षांपूर्वीचा चित्रपट आजही तेवढाच समर्पक ठरतोय. आजच्या टिंडरच्या जमान्यात तब्बल 42 वर्ष जुना चित्रपट रिलेवेंट होतोय, हे आश्चर्यकारकच आहे. 'अर्थ' (Arth) असं या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाला कल्टचा दर्जा मिळाला आहे.
सध्या सुरू असलेल्या मामी फेस्टिव्हलमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. आजच्या टिंडरच्या जमान्यातली बदललेली नाती आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सवर आधारित हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे. त्यामुळेच प्रदर्शित होऊन इतके दिवस होऊनही हा अत्यंत खास आहे.
पती-पत्नीच्या नात्यावरचा संवेदनशील चित्रपट
'अर्थ' पती-पत्नीच्या नात्यावर अत्यंत गंभीर आणि संवेदनशील पद्धतीनं भाष्य करतो. या चित्रपटात कुलभूषण खडबंदा (Kulbhushan Kharbanda) यांनी पत्नी शबाना आझमीसोबत असूनही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असलेल्या पतीची भूमिका साकारली आहे. तर, ज्यांच्यासोबत त्यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, त्या स्त्रीची भूमिका दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांनी साकारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आपल्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू आहे, याची पत्नी (शबाना आझमींची भूमिका) यांना माहिती आहे. पण, त्यानंतर चित्रपटातील सर्वात मोठा ट्वीस्ट म्हणजे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतानाचा त्या कथानकातील पत्नीचा प्रवास.
चित्रपटात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असूनही पती इंदर (कुलभूषण खडबंदा यांची भूमिका) चित्रपटात खलनायक नाही. याबद्दल ते आपल्या पत्नीशी उघडपणे बोलतात आणि आपल्या पत्नीला किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला अंधारात सोडत नाही. दुसऱ्या महिलेच्या पतीसोबत अफेअर असूनही स्मिता पाटील यांचं पात्र इतक्या उत्तमपणे दाखवण्यात आलं आहे की, तुम्हाला कुठेही ते नकारात्मक वाटत नाही.
प्रदर्शित होताच या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. स्मिता पाटील आणि शबाना आझमी या चित्रपटात दमदार भूमिका साकारताना दिसल्या होत्या. या चित्रपटासाठी शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
IANS नुसार, चित्रपटाची रेस्टोरेशन NFDC-NFAI नं केलं आहे. नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन (NFHM) अंतर्गत रेस्टोरेशन करण्यात आलं आहे. हे मिशन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारताच्या समृद्ध सिनेमॅटिक वारशाचं डिजिटायझेशन आणि जतन करणं आहे. जेणेकरून 'अर्थ' सारखे अनेक आयकॉनिक चित्रपट भविष्यातही अगदी सजह उपलब्ध करुन देणं हाच आहे. या चित्रपटाची 35 मिमी रिलीज प्रिंट 4K रिझोल्यूशनमध्ये डिजिटल केली गेली आहे. चित्रपटाच्या ऑडिओमधील सिंक समस्या देखील दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
दिग्दर्शक महेश भट्ट काय म्हणाले?
IANS नं महेश भट्ट यांना उद्धृत करून लिहिलं आहे की, हा चित्रपट माझ्या आयुष्यातील नाडी आणि हृदयाचा ठोका आहे, जो फिल्टरशिवाय भावना आणि सत्य दाखवतो. महेश भट्ट पुढे म्हणाले की, हा चित्रपट MAMI चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जात आहे, ज्यामुळे नव्या पिढीला एक कथा अनुभवता येईल, जी तेव्हा होती तितकीच आजही रिलेवंट आहे. चित्रपट जतन केल्याबद्दल त्यांनी NFAI टीमचे आभारही व्यक्त केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :