एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ

Weekly Lucky Zodiacs 21 To 27 October 2024 : ऑक्टोबरचा चौथा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Horoscope 21 To 27 October Lucky Zodiacs : ऑक्टोबरचा चौथा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 21 ऑक्टोबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात गौरी योगासह (Gauri Yog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि सौभाग्य घेऊन आला आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन किंवा घर घेण्याचा किंवा विकण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही वाद असल्यास, या आठवड्यात त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. या आठवड्यात केलेले सर्व प्रवास तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक असतील. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा इच्छित जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही एखाद्यासमोर तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला होकारार्थी उत्तर मिळू शकतं. तुमचे नातेवाईक तुमच्या प्रेमविवाहास मान्यता देतील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ऑक्टोबरचा चौथा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमची ऊर्जा आणि वेळ या दोन्हींचं योग्य व्यवस्थापन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या आठवड्यात तुम्ही जे काही काम नियोजन करून कराल ते वेळेवर पूर्ण होईल. तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी दोघांचं सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याबाबत चर्चा करू शकता, पण त्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. आठवड्याच्या मध्यात काही शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचं प्रेम जीवन पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत लांबच्या सहलीला जाऊ शकता किंवा जवळपास कुठेतरी पिकनिकला जाऊ शकता.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा संमिश्र ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकू येईल. तथापि, आठवड्याच्या मध्यात कामात काही व्यत्यय आल्याने तुम्ही थोडे चिंतेत असाल. पण, तुम्ही त्या सर्वांवर मात कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत तुमचा बराच काळ सुरू असलेला वाद या काळात मिटेल. सर्वांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण होतील. मुलांशी संबंधित तुमच्या मनात असलेल्या सर्व चिंता या आठवड्यात संपतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तो सावलीसारखा तुमच्यासोबत असेल.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा अधिक शुभ आणि यश मिळवून देणारा आहे. या काळात तुमची कामं वेळेवर पूर्ण झाल्यास तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी यांच्यात चांगला समन्वय राहील. मालमत्ता आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये हा आठवडा तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. एवढंच नाही तर यावेळी तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो तुमच्या हिताचा असेल. तुम्ही तुमचे सर्व निर्णय अतिशय हुशारीने घ्याल. तुमच्यासाठी सल्ला असा आहे की, जर तुम्हाला तुमची लव्ह लाईफ चांगली करायची असेल तर तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंद आणि सौभाग्य देणारा आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्ही चैनीशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च करू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी तुमचे घरातील विरोधक स्वतः पुढाकार घेऊ शकतात. एखाद्या वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने संपत्तीच्या वादावर अपेक्षित तोडगा काढता येईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक असेल. व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. जे लोक आधीच प्रेमसंबंधात आहेत, त्यांची वैवाहिक इच्छा पूर्ण होऊ शकते. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर गुरू शुक्राच्या राशीत वक्री; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare: परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थितParbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोरKurla Bus Accident Video : निर्लज्जपणाचा कळस, कुर्ला अपघातातील मृत महिलेच्या बांगड्या चोरल्याCabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare: परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवारांना भेटून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Embed widget