Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
नवाब मलिकांच्या उमेदवारीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप माहिती घेऊन आमचे प्रवक्ते अधिकृत भूमिका जाहीर करतील. फडणवीसांची प्रतिक्रिया, राज्यात तीन ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असंही फडणवीसांचं वक्तव्य.
विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल, वनगा यांचे दोन्ही फोन बंद, कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून वनगांचा शोध सुरू.
मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा यांच्या पत्नीशी फोनवरुन संवाद, विधानपरिषदेत श्रीनिवास वनगा यांना संधी देणार.
स्थानिक नेतृत्वाला विचारात न घेता उमेदवार जाहीर केला, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अतुल अतुल शाहांनी व्यक्त केली नाराजी.
अमित ठाकरेंच्या विजयासाठी माहीम कोळीवाड्यातील कोळी बांधव एकविरेचं दर्शन घेणार, एकविरेला जाण्यापूर्वी कोळी बांधव देवीची ओटी शिवतिर्थवर घेऊन जाणार .
संजय निरुपम यांना दिंडोशीतून तिकीट दिल्याने स्थानिक शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी नाराज, शिवसेना विधानसभा समन्वयक वैभव भराडकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार.
माजी आमदार तृप्ती सावंत यांचा मनसेत प्रवेश, वांद्र पूर्व मतदारसंघातून मनसेकडून उमेदवारी, त्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये आता झिशान सिद्धीकी, वरुन सरदेसा आणि तृप्ती सावंत अशी तिरंगी लढत रंगणार.