Majha Gaon Majha Bappa : आले गणराय! सगळीकडे प्राणप्रतिष्ठेची लगबग
Majha Gaon Majha Bappa : आले गणराय! सगळीकडे प्राणप्रतिष्ठेची लगबग
आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)